---Advertisement---

‘काही खास केले…’, राहुल द्रविडने 2 महिन्यांनंतर उघड केले विश्वविजेता बनण्याचे रहस्य

On: शुक्रवार, ऑगस्ट 23, 2024 10:18 AM
---Advertisement---

या वर्षी भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. यासह राहुल द्रविडचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी द्रविडने टीम इंडियाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळ कसा संपवला हे सांगितले आहे. द्रविड म्हणाला की, यासाठी संघ किंवा टीम मॅनेंजमेंटने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर टीम इंडियाला ही ट्रॉफी उचलणे कठीण झाले होते. पण यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले.

भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला रोमहर्षक लढतीत हरवून हे विजेतेपद पटकावले. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. संघाने 10 सामने खेळले आणि सर्व सामने जिंकले. “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला काही वेगळे करायचे नव्हते. मला वाटते की विश्वचषकात आमचा चांगला खेळ होता. रोहितसह सर्वजण त्यात सामील होते”. द्रविडने सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारादरम्यान सांगितले.

माजी प्रशिक्षक म्हणाला, “आम्ही तयारीच्या बाबतीत विशेष काही केलो नाही. आम्ही 10 सामने खेळलो. सर्व सामन्यांमध्ये आम्ही वर्चस्व गाजवले. मला संघात काहीही बदल करायचे नव्हते. संघात सर्वसाधारण एकमत होतं की, आम्ही जे केलं तेच आम्हाला करायचं होतं. आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये तीच ऊर्जा निर्माण करायची होती.

द्रविड म्हणाला की, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा चांगला खेळला होता. तो म्हणाला, “आमचा प्रवास खूप चांगला होता. आम्ही अंतिम फेरीत अडकलो आणि ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. ते आमच्यापेक्षा चांगले संघ होते आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही झाले. खेळात असे घडते आणि हाच खेळ असतो.”

हेही वाचा-

केएल राहुलची निवृत्तीची घोषणा? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ
हे दोन फलंदाज ठरवतील बॉर्डर-गावस्कर मालिकेचा निकाल, मॅथ्यू हेडनचा मोठा अंदाज
‘माझ्याकडून खूप मोठी… ‘, धोनीबाबत झालेल्या चुकीबद्दल दिनेश कार्तिकने मागितली माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---