येत्या जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रानं जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. या स्टार भालाफेकपटूनं पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं.
फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या या गेम्समध्ये नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं. यासह त्यानं ऑलिम्पिकपूर्वी आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेत फिनलंडचा टोनी केरानेन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यानं 84.19 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं. फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरनं 83.96 मीटर भालाफेक करून कांस्यपदक जिंकलं.
नीरज चोप्रा सुरुवातीला चांगली सुरुवात केल्यानंतर मागे पडला होता. त्यानं पहिल्या प्रयत्नात 83.62 मीटर थ्रो केला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो केवळ 83.45 मीटरच थ्रो करू शकला. इथपर्यंत तो ऑलिव्हर हेनलँडरपेक्षा मागे होता. ऑलिव्हरनं दुसऱ्या प्रयत्नात 83.96 मीटर थ्रो केला होता. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरज त्याच्या पुढे गेला, जो त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. 8 खेळाडूंपैकी नीरज एकमेक खेळाडू होता, ज्यानं 85 मीटरचा टप्पा पार केला.
तिसऱ्या थ्रोनंतर नीरजचं उरलेले थ्रो खूपच कमकुवत होते. चौथ्या प्रयत्नात तो केवळ 82.21 मीटर भालाफेक करू शकला. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल झाला. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यानं 82.97 मीटर थ्रो केला.
Neeraj Chopra strikes gold again!
With a stunning throw of 85.97m, he clinches victory at the Paavo Nurmi Games 2024 in Finland.
Congratulations Champ✌️ pic.twitter.com/Fnq34bZRxV
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 18, 2024
नीरजचे सहाही प्रयत्न
पहिला प्रयत्न: 83.62 मीटर
दुसरा प्रयत्न: 83.45 मीटर
तिसरा प्रयत्न: 85.97 मीटर
चौथा प्रयत्न: 82.21 मीटर
पाचवा प्रयत्न: फाऊल
सहावा प्रयत्न: 82.97 मीटर
सर्व भालाफेकपटूंचे सर्वोत्तम थ्रो
नीरज चोप्रा (भारत) – 88.36 मीटर
टोनी केरानेन (फिनलंड) – 84.19 मीटर
ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) – 83.96 मीटर
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – 82.58 मीटर
एंड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) – 82.19 मीटर
केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद) – 81.93 मीटर
मॅक्स डेहनिंग (जर्मनी) – 79.84 मीटर
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरचा होणार टीम इंडियात कमबॅक! रियान पराग, अभिषेक शर्मालाही मिळू शकते संधी
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला
मुख्य प्रशिक्षक पदासाठी पहिल्याच मुलाखतीत गंभीरनं बीसीसीआयसमोर ठेवल्या 5 अटी





