पुणे,दि.4 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, समीहन देशमुख, स्वर्णिम येवलेकर, अयान शेट्टी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात नीरज जोर्वेकर व अर्चित डहाळे यांनी अनुक्रमे वीरेन सूर्यवंशी व तनिश जोशी यांचा 9-4 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. समीहन देशमुखने अभिनव महामुनीवर 9-3 असा विजय मिळवला.
तामिळनाडूच्या प्रणव एसआरने महाराष्ट्राच्या राधेय शहाणेचा 9-1 असा सहज पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला. स्वर्णिम येवलेकरने वेदांग चढ्ढाला 9-3 असे पराभुत केले. अयान शेट्टीने तनिश बेलगलकरचा 9-1 असा पराभव केला. (Neeraj Jorvekar, Samihan Deshmukh, Swarnim Yevlekar progress in U-18 Super Series Tennis Tournament)
निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
नीरज जोर्वेकर (महा)वि.वि.वीरेन सूर्यवंशी (महा) 9-4;
समीहन देशमुख(महा)वि.वि.अभिनव महामुनी(महा) 9-3;
अर्चित डहाळे(महा)वि.वि.तनिश जोशी (महा) 9-4;
प्रणव एसआर (तामिळनाडू)वि.वि.राधेय शहाणे (महा) 9-1;
स्वर्णिम येवलेकर(महा)वि.वि.वेदांग चढ्ढा 9-3;
अयान शेट्टी(महा)वि.वि.तनिश बेलगलकर(महा) 9-1.
महत्वाच्या बातम्या –
मानेग्रो नरेंद्र सोपल मेमोरियल टेनिस क्लब अजिंक्यपद स्पर्धा । पीवायसी अ आणि ब, टेनिसनट्स रॉजर, टेनिसनट्स राफा संघांनी गाढली उपांत्य फेरी
७ नोव्हेंबर पासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महिंद्रा थार, ट्रॅक्टर सह विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट