---Advertisement---

शानदार अर्धशतकानंतर युवराजचा असा झाला मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंगरुममध्ये सन्मान

On: सोमवार, मार्च 25, 2019 8:51 PM
---Advertisement---

रविवारी( 24 मार्च) आयपीएल 2019 चा तिसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीेने मुंबईचा 37 धावांनी पराभव केला. मात्र या पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या संघ मालकिण निता अंबानी यांनी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आणि गोलंदाज मिशेल मॅक्लेनघन यांचा खास बॅच देऊन सन्मान केला आहे.

याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात मुंबईकडून युवराजने अर्धशतकी खेळी करताना 35 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले होते. मुंबईच्या डावातील ही सर्वोच्च खेळी होती.

तसेच मॅक्लेनघनने मुंबईकडून चार षटकात 40 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांच्या परिश्रमानंतरही मुंबईला मात्र अन्य फलंदाजांनी खास काही न केल्याने पराभव स्विकारावा लागला.

पण या दोघांच्या प्रयत्नांचा सन्मान मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये करण्यात आला आहे. यावेळी युवराज म्हणाला, ‘तो आनंदी आहे, पण सामना जिंकला असता तर अजून आनंद झाला असता. या सामन्य़ातून सकारात्मक गोष्टी घेत आहे. हा मोसम अजून मोठा आहे.’

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या नाबाद 78 धावांच्या जोरावर 213 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल मुंबईला 176 धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०१९: अजिंक्य रहाणेच्या राजस्थान संघाने जिंकली नाणेफेक, असे आहेत ११ जणांचे संघ

युवराज सिंगने निवृत्तीबाबत केले मोठे भाष्य, पहा व्हिडिओ

या कारणामुळे विराट कोहली होता चिंतेत…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment