भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगच्या निवृत्तीबद्दल मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. पण आता युवराजनेच जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्वप्रथम तोच निवृत्ती घेईल, असे स्पष्ट केले आहे.
युवराजसाठी आयपीएलचे मागील काही मोसम खास ठरले नव्हते. पण यावर्षीच्या मोसमाच्या सुरुवातीलाच त्याने रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अर्धशतक करत शानदार सुरुवात केली आहे. पण तो मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
या सामन्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्याने सांगितले की ‘जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी सर्वात प्रथम निवृत्ती घेईल.’
तसेच युवराज म्हणाला, ‘मागील दोन वर्षात माझ्यासमोर अनेक चढ-उतार आले आहेत. मला काय करावे सुचत नव्हते.’ पण त्यानंतर तो म्हणाला त्याने स्वत:चे आत्मपरिक्षण केले, त्यावेळी त्याला लक्षात आले की 16 वर्षांखालील एखाद्या क्रिकेटपटूप्रमाणे राष्ट्रीय संघातील निवडीबद्दल विचार न करता तो अजूनही क्रिकेटची मजा घेऊ शकतो.
2007 च्या टी20 आणि 2011 च्या विश्वचषक विजयात भारताकडून मोलाची कामगिरी करणारा युवराज म्हणाला, ‘माझ्यासाठी मुख्य गोष्ट होती ती म्हणजे मी क्रिकेट खेळायला का सुरुवात केली. मी क्रिकेट खेळतो करण मला मजा येते.’
‘मी जेव्हा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होतो तेव्हा मी भारताकडून खेळत नव्हतो. मी जेव्हा 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मी क्रिकेटचा आनंद घेत होतो. त्यामुळे जोपर्यंत मला क्रिकेटचा आनंद मिळत आहे तोपर्यंत मी खेळणार आहे.’
त्याचबरोबर युवराने दिग्गज फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरशीही याबाबतीत चर्चा केली होती. याबद्दल युवराज म्हणाला, ‘मी सचिनशी याबद्दल बोललो आणि तो जेव्हा 37-38-39 वर्षांचा होता तेव्हा या स्थितीतून गेला आहे. त्याच्याशी बोलण्याने माझ्यासाठी काही गोष्टी सोप्या झाल्या. मी खेळत आहे कारण मी क्रिकेटची मजा घेत आहे.’
https://twitter.com/IPL/status/1110067288496066561
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे विराट कोहली होता चिंतेत…






