---Advertisement---

पहिल्याच सामन्यात खेळताना जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त…

On: सोमवार, मार्च 25, 2019 5:17 PM
---Advertisement---

वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली आहे. पहिल्या इंनिंगचा शेवटचा चेंडू टाकताना धावा वाचवण्याच्या प्रयत्नात बुमराला खांद्याला दुखापत झाली आहे.

बुमराहने पहिल्या इंनिंगचा अंतिम चेंडू पंतला यॉर्कर टाकला. पंतने या चेंडूला सरळ खेळला आणि धाव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला झोकून दिले. याच प्रयत्नांत त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर खेळाडूंबरोबरच संघाचे फिजियो सुद्धा मैदानावर आले, फिजियोच्या मदतीने बुमराह उठून मैदानाबाहेर गेला.

हाती आलेल्या माहितीनुसार, बुमराची दुखापत गंभीर स्वरूपाची नसली तरी फलंदाजी करण्यासाठी मात्र तो मैदानावर उतरला नाही. त्यावर समालोचक संजय मांजरेकर म्हणाला बुमराह ठीक आहे.

आयपीएलनंतर लगेचच विश्वचषकाला सुरुवात होणार आहे आणि बुमराह भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज आहे. अशातच त्याचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी नक्कीच चिंतेची बाब असेल. याअगोदर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कामाच्या योग्य नियोजनावर ध्यान देण्याचे खेळाडूंना सांगितले होते.

बुमराह, मोहम्मद शमी, आणि अष्टपैलु हार्दिक पंड्या हे विश्वचषकाचे नक्कीच महत्वाचे भाग राहणार आहेत. आयपीएल सुरु होण्याअगोदर या खेळाडूंचा कार्यभार नियोजन या मुख्य विषय होता.

आयपीएल- १२ च्या या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्लीने २१३ धावांचा डोंगर रचला होता.
दिल्लीची सुरुवात निराशजनक राहिली होती पण पंतने २७ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ७८ धावांची ताबडतोड खेळी केली.

प्रतिउत्तरात मुंबईने मात्र सर्वबाद १७६ धावपर्यंतच मजल मारली. मुंबईला या सामन्यात ३७ धावांनी हार पत्करावी लागली. मुंबईला आयपीएल इतिहासात २०० धावांपेक्षा जास्तचे लक्ष कधीच मिळवता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

क्षेत्ररक्षण करताना राहुल तेवतीयाचा अनोखा पराक्रम,या दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

आयपीएल २०१९: राजस्थान विरुद्ध पंजाब- या ५ क्रिकेटर्सच्या कामगिरीकडे राहणार चाहत्यांचे लक्ष..

एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्ह स्मिथ विषयी पंजाबच्या कर्णधार अश्विनने केले हे विधान..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment