आयपीएल २०१९ मध्ये आज राजस्थान रॉयल्स आपला आयपीएलचा या मोसमातील पहिला सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळणार आहे.
आकडेवारी पाहता राजस्थान रॉयल्स किंग्स इलेव्हन पंजाबच्या वरचढ पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघादरम्यान झालेल्या १७ सामन्यात १० वेळा राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे तर किंग्स इलेव्हन पंजाबला केवळ ७ सामन्यांत आपली कमाल दाखवता आली आहे.
या वर्षी सुद्धा ही आकडेवारी शाबूत ठेवण्याचे आव्हान अजिंक्य राहणे आणि संघाकडे असेल. दिल्ली आणि बेंगलोर बरोबरच पंजाब असा एकमेव संघ आहे ज्याने आत्तापर्यंत आयपीएल किताबाला गवसणी घातली नाही.
या सामन्यामध्ये या ५ प्रतिस्पर्धी जोड्यांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे-
१) के एल राहुल विरुद्ध धवल कुलकर्णी
मागील वर्षीच्या मोसमात के एल राहुल १४ सामन्यात ६५९ धावा काढल्या होत्या. त्या जोरावर पंजाबची सुरुवातही दिमाखात झाली होती. एकदा का या सलामीवीराला सूर गवसला की त्याला थांबवणे हे गोलंदाजासाठी खूपच कठीण होऊन बसते. तशातच काही संघांनी मात्र नव्या चेंडू सोबत धवल कुलकर्णीचा प्रयोग यशस्वी केला आहे. राजस्थानच्या या गोलंदाजाचे राहुल विरोधात रेकॉर्ड मात्र चांगले आहे गेल्या मोसमात धवलने राहुलला ३ वेळा बाद केले आहे त्यामुळे राहुल विरुद्ध धवल हा सामना चुरशीचा पाहायला मिळणार आहे.
२) ख्रिस गेल विरुद्ध कृष्णप्पा गौतम
गेलचे आयपीएल मध्ये चांगले रेकॉर्ड आहे आणि तो कधीही कोणत्याही गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो हे जगविख्यात आहे. पण फिरकी गोलंदाजी ही त्याची नेहमीच कमजोरी राहिली आहे. पंजाब संघाचा सध्याचा कर्णधार आर अश्विन 2017 पर्यंत त्याला पॉवरप्लेमधेच बाद करायचा. शेवटचा मौसम हा कृष्णप्पा गौतमसाठी खूप अनुकूल राहिला असून त्याची आणि गेलची चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.
३) जॉस बटलर विरुद्ध मुजीब-उर- रहमान
जॉस बटलर हा खरच गोलंदाजांसाठी खूप कठीण फलंदाज आहे. आणि मर्यादित षटकांत त्याला गोलंदाजी करणे म्हणजे सत्वपरीक्षाच! बटलर हा फिरकी आणि मध्यम गतीची गोलंदाजी चांगली खेळतो त्याबरोबरच त्याने मागील मौसमात ५४८ धावा ठोकल्या होत्या. बटलरने पंजाब विरुद्ध गतवर्षी खेळताना ५१ आणि ८२ धावा काढल्या होत्या तर त्या दोन्ही सामन्यात मुजीब-उर- रहमानने बटलरला तंबूत धाडले होते. त्यामुळे या दोघांची टक्कर ही महत्पूर्ण आहे.
४) अजिंक्य रहाणे विरुद्ध आर अश्विन
राजस्थानचा कर्णधार रहाणे हा आयपीएलमध्ये अश्विनच्या फिरकी विरुद्ध खेळताना नेहमीच अडखळताना दिसला आहे. अश्विन विरुद्ध खेळताना त्याने २६ चेंडूत २५ धावा काढल्या आहेत तर अश्विनने त्याला ३ वेळा तंबूत परतवले आहे. त्यामुळे कर्णधार विरुद्ध कर्णधार हा सामना पाहावयास मिळणार आहे.
५) बेन स्टोक्स विरुद्ध अँड्र्यू टाय
गतवर्षीच्या मौसमात १४ सामन्यात २४ बळी घेत अँड्र्यू टायने पर्पल कॅप वरती आपले नाव कोरले होते. बेन स्टोक्स हा साधारणतः ५-६ क्रमांकावरती खेळणारा खेळाडू आहे आणि अँड्र्यू टाय सुद्धा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे त्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्ह स्मिथ विषयी पंजाबच्या कर्णधार अश्विनने केले हे विधान..
–मुंबई इंडियन्सकडून आज संधी मिळालेला कोण आहे हा रसीक सलाम?
–आयपीएल २०१९: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असा आहे मुंबई इंडियन्सचा ११ जणांचा संघ






