---Advertisement---

आयपीएलआधी सौरव गांगुलीचा युवराज सिंगला खास सल्ला, पहा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 24, 2019 7:10 PM
---Advertisement---

मुंबई। आज(24 मार्च) आयपीएल 2019 चा तिसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

यावेळी मुंबईच्या संघात भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा समावेश झाला आहे. त्याला यावर्षीच्या आयपीएल लिलावात मुंबईने त्याच्या 1 कोटी या मुळ किमतीत संघात सामील करुन घेतले होते.

आज होणाऱ्या सामन्याआधी युवराजला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक खास सल्ला दिला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार असणारा गांगुली युवराजला वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रा दरम्यान भेटला होता. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेच्या शेवटी आपापल्या कॅम्पमध्ये परतत असताना गांगुलीने युवराजला शुभेच्छा दिल्या आणि ‘युवराज सिंगसारखा खेळ’ असा सल्लाही दिला.

युवराज आणि गांगुलीच्या या संवादाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

यावर्षी मुंबईकडून खेळणाऱ्या युवराजची कामगिरी कशी होते, याकडे आता सर्वांचेच लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

१ वर्षानंतर वॉर्नरचे शानदार पुनरागमन, पहिल्याच सामन्यात केले ३ मोठे पराक्रम

या संघाचे आयपीएलमध्ये झाले आहेत सर्वाधिक कर्णधार

सनरायझर्स हैद्राबादचे आज नेतृत्व करणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा अनोखा विक्रम…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment