---Advertisement---

ऑलम्पिक इतिहासात पहिलांदाच उघडणार ‘इंडिया हाऊस’..

On: सोमवार, मार्च 25, 2019 5:23 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि कोसोवो या देशांना व्हिसा नाकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक परिषद (आईओए) टोकियो ऑलिम्पिक मध्ये एक अनोखा उपक्रम राबवणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक दरम्यान आयओएकडून ‘इंडिया हाऊस’ उघडण्यात येणार आहे. ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच असे होईल जेव्हा आईओए हा हाऊस उभारून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवेल. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, भोजन, आणि योग प्रदर्शन या बाबींचा समावेश असेल.

हाऊसमधे भारतीय पाहुणचाराबरोबरच भारतीय संघाचं ऑलिम्पिकमधील प्रदर्शन आणि भारतीय संघाचा अधिकृत पोशाख यांचही प्रदर्शन केले जाईल. त्याचबरोबर इंडिया हाऊसमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सम्मान देखील आयओए करणार आहे.

ऑलिम्पिक व्हिलेज जवळच असणार हाऊस-
आयओएचे जनरल सेक्रेटरी राजीव मेहता म्हणाले, टोकियोमध्ये हाऊससाठी जागा पाहण्याबरोबरच आयोजकांबरोबर बोलणे देखील झाले आहे. इंडिया हाऊस ऑलिम्पिक व्हिलेजच्या जवळच असेल. आरिआके या ठिकाणी उघडण्यात येणाऱ्या इंडिया हाऊसच्या जवळ चार खेळांचे आयोजन स्थळसुद्धा होणार आहे.

मेहता म्हणाले, हा निश्चितच एक वेगळा प्रयोग आहे. तसेही खूप सारे देश हे आपापल्या देशाचे हाऊस हे १९९२ सालच्या ऑलिम्पिक पासून सुरु करण्यात आले, पण भारताकडून प्रथमच हे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे याचे काही प्रमाणात दुरोगामी परिणाम सुद्धा पाहायला मिळतील.

सर्व सामान्यांबरोबरच विशेष अतिथी सुद्धा करणार आमंत्रित-
इंडिया हाऊसमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य लोकसुद्धा या हाऊसमध्ये येऊ शकणार आहेत. सकाळच्या सत्रात सर्वसामान्यांसाठी हे हाऊस उघडे ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान योग प्रदर्शनाबरोबरच देशाने विविध खेळात केलेल्या विक्रमांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.

संध्याकाळच्या सत्रात, विविध देशांच्या पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होईल. खरे तर अमेरिका, फ्रान्स आणि चीन सारखे देश हे मोठ्या खेळाचे आयोजन मिळवण्यासाठी आपापले हाऊस उघडतात. याचा त्यांना फायदा देखील होतो. रिओ ऑलिम्पिक दरम्यान ३२ देशांनी आपले हाऊस उघडले होते. या हाऊसच्या माध्यमातून भारत सुद्धा ऑलिम्पिक २०३२ च्या आयोजनाची संधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही मेहता म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्याच सामन्यात खेळताना जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त…

क्षेत्ररक्षण करताना राहुल तेवतीयाचा अनोखा पराक्रम,या दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

आयपीएल २०१९: राजस्थान विरुद्ध पंजाब- या ५ क्रिकेटर्सच्या कामगिरीकडे राहणार चाहत्यांचे लक्ष..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment