ऑस्ट्रेलियाचा माजी विस्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर आता त्याच्या क्रिकेट करिअरची एक नवी सुरुवात करत आहे. 37 वर्षांच्या डेविड वॉर्नरने अमेरिकेच्या टी20 लीग मेजर लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सिझनसाठी सीएटल ऑर्कास संघासोबत करार केला आहे. ही स्पर्धा 12 जून ते 13 जुलै 2025 पर्यंत अमेरिकामध्ये खेळली जाणार आहे. हा डेविड वॉर्नरचा मेजर लीग क्रिकेटमध्ये पहिला सामना असणार आहे. ही स्पर्धा 2023 मध्ये सुरू झाली होती आणि हळूहळू या स्पर्धेची लोकप्रिय वाढत जात आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात शानदार फलंदाजांमध्ये एक मानला जाणारा डेविड वॉर्नर आत्तापर्यंत 401 टी20 सामने खेळला आहे आणि त्याने 12,956 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नरचा स्ट्राइक रेट 140.27 आहे. खास गोष्ट म्हणजे तो सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत आहे आणि मोठे- मोठे शॉर्ट खेळण्यासाठी तो अजिबात घाबरत नाही.
डेविड वॉर्नर आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये सुद्धा एक आहे. त्याने आतापर्यंत 6,500 धावा केल्या आहेत. सध्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावादरम्यान त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. परंतु या झटक्याचा त्याच्या खेळण्यावर कोणताच परिणाम झाला नाही. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्स संघाचा कर्णधार आहे आणि सिडनी थंडरला बिग बॉस लीगच्या फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी त्याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जिथे त्याने 12 डावांमध्ये 405 धावा केल्या होत्या, याशिवाय आयएलटी 20 मध्ये तो दुबई कॅपिटल्स चॅम्पियन संघाचा हिसा होता.
सीएटल ऑर्कास संघाला आशा आहे की, डेविड वॉर्नरच्या उपस्थितीत त्यांचे नशीब बदलेल. 2023 सालामध्ये जेव्हा एमएलसी सुरुवात झाली होती, तेव्हा सीएटल ऑर्कास संघर्ष पॉईंट्स टेबलमध्ये टॉपच्या स्थानी होता. परंतु मागच्या वर्षी त्यांच्या संघाचे प्रदर्शन अत्यंत खराब राहीले. त्यांनी फक्त एक विजय मिळवला. डेविड वॉर्नर सारख्या अनुभवी खेळाडू त्यांच्या संघामध्ये सामील झाल्यानंतर संघ मजबूतरित्या पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. तसेच एमएलसी आणि इंग्लंड द हंड्रेड लीग या स्पर्धेच्या तारखा अजून ठरवलेल्या नाहीत, ज्यामुळे डेविड वॉर्नर दोन्ही स्पर्धेत खेळू शकतो. तो या वर्षानंतर इंग्लंडमध्ये लंडन स्पिरिट संघाकडून सुद्धा खेळताना दिसू शकतो.





