---Advertisement---

भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा

Nehal-Wadhera
---Advertisement---

लुधियानाचा क्रिकेटपटू निहाल वढेराने पंजाबच्या २३ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात बठिंडाविरुद्ध ५७८ धावांची ऐतिहासिक खेळी केली. वढेरा आता पंजाब क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. या २१ वर्षीय खेळाडूने ४१४ चेंडूत ४२ चौकार आणि ३७ षटकारांच्या मदतीने ५७८ धावा चोपल्या. या चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लुधियानाने ६ विकेट्सच्या नुकसानावर ८८० धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बठिंडा संघाने चार विकेट्सच्या नुकसानावर ११७ धावा केल्या आहेत.

मोडला ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम
निहाल वढेरा (Nehal Wadhera) भारतीय दिग्गज युवराज सिंगचा मोठा चाहता आहे. त्याचे वडील कमल वढेरा लुधियानामध्ये एक कोचिंग चालवतात. बठिंडाविरुद्ध केलेल्या ५७८ धावांच्या खेळीनंतर वढेरा पंजाब क्रिकेटमध्ये सर्वात्तम खेळी करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम चमन मल्होत्राच्या नावावर होता. तसेच, जागतिक क्रिकेटमध्ये वढेरा सर्वोत मोठी खेळी करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. या सामन्यात त्याने १३९ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यादरम्यान बढेरा सर्वात जलदगतीने २००, ३००, ४०० आणि ५०० धावा करणारा फलंदाज देखील बनला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे केले आहे प्रतिनिधित्व 
निहाल वढेरा यापूर्वी भारताच्या १९ वर्षाखालील संघासाठी खेळला आहे. जुलै २०१८ मध्ये श्रीलंका दौऱ्यात त्याने दोन अर्धशतके केले होते. तसेच, २०१७-१८ साली कूट बिहार ट्रॉफीदरम्यान त्याने ६ अर्धशतकांच्या मदतीने ५४० धावा केल्या होत्या. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने वढेराचा ट्रायलसाठी बोलावले होते, पण तो निवडला गेला नाही. परंतु दिग्गज कुमार संगकारासोबत वेळ घालवल्यामुळे त्याची फलंदाजी नक्कीच सुधारली आहे. लुधियानाचा तो तिसरा क्रिकेटपटू आहे, ज्याने कोणत्यातरी पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी यशपाल शर्मा आणि गगनदीप सिंग हे लुधियानाचे खेळाडू भारतासाठी खेळले आहेत.

कपूरथलाविरुद्धच्या सामन्यात देखील वढेराने अप्रतिम प्रदर्शन केले होते. या सामन्यात त्याच्या बॅटमधून १५१ धावा निघाल्या होत्या. तसेच, गोलंदाजी तीन विकेट्सही नावावर केल्या होत्या. लुधियानाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले होते. अशात आता त्याने ५७८ धावांची ही ऐतिहासिक खेळी करून सर्वांचे लक्ष स्वतःकडे खेचले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने १७१ धावा करून शिखर धवन आणि ललित यादवचा विक्रमही मोडीत काढला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

केकेआरला फायनलपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचे टी२० विश्वचषकातील स्थान धोक्यात, आयपीएलमध्ये ठरतोय सपशेल फ्लॉप

मुंबई खेळतीये मोठा डाव, ‘या’ घातक गोलंदाजाला संघात परत बोलावले; आता उरलेले ६ सामने जिंकण्याचा निर्धार

चार विकेट्स घेऊनही पंतने कुलदीपला का दिले नाही त्याच्या हक्काचे चौथे षटक? स्वत:च सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---