इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डॅरिल मिचेल आणि टॉम ब्लंडल यांनी चिवट फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. सामन्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर हा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्लेइंग इलेव्हनचा भाग नसूनही वॅगनरने मैदानावर अशी काही कृती केली आहे, ज्यामुळे तो चाहत्यांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वॅगनरला (Neil Wagner) सामना पाहायला आलेल्या क्रिकेटप्रेमींसोबत बोलताना पाहिले गेले. यादरम्यान त्याने एका चाहत्याला आपल्या पॅड्सची जोडी (Pair Of Pads) भेट दिली. वॅगनरच्या या दरियादिलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी वॅगनर दुसऱ्या खेळाडूच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिला होता. यादरम्यान तो सीमारेषेजवळ बसलेल्या प्रेक्षकांनी बोलू लागला. दरम्यान एका चाहत्याने त्याच्याकडे पॅड्सची जोडी देण्याची मागणी केली, ज्यावर त्याने त्वरित आपले नवेकोरे पॅड्स घेऊन ते चाहत्याला भेट (Neil Wagner Gifts Pair Of Pads To Fan) दिले. तसेच त्याने दर्शकदीर्घामध्ये बसलेल्या काही चाहत्यांना ऑटोग्राफही दिला. वॅगनरच्या या कृतासाठी त्याचे भरपूर कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Shout out to Neil Wagner for being one of the best blokes in cricket. pic.twitter.com/vIzcpzlZcg
— Dealt With. (@dealtwithcric) June 2, 2022
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात यजमान इंग्लंडने नाममात्र ९ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा पाहुण्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांनी २३ षटकांमध्ये ५६ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर डॅरिल मिचेल आणि टॉम ब्लंडल जोडीने चिवट झुंज देत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ही जोडी मैदानावर टिकून राहिली.
मिचलेने नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकारही मारले. तसेच ब्लंडलनेही १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ९० धावा जोडल्या. त्या दोघांमध्ये १८० धावांची अभेद्य भागीदारीही झाली आहे. या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने २२७ धावांची आघाडी घेतली आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची झाली कोरोना टेस्ट; काय आला रिपोर्ट?