भारतीय संघाच्या कर्णधारांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा रोहित शर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंची चर्चा होते. मात्र, भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याचे मत जरा वेगळे आहे. त्याच्या मते, भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात दीर्घ काळ खेळू शकणारा पठ्ठ्या म्हणजे ऋतुराज गायकवाड होय. एवढंच नाही, तर तो नेतृत्वही करू शकतो. ऋतुराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात दमदार खेळ करत शतक झळकावले होते.
विशेष म्हणजे, 26 वर्षीय ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने अलीकडेच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्ण पदक जिंकले होते. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) जेव्हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा भाग होता, तेव्हा त्यावेळी ऋतुराजला त्याने जवळून पाहिले होते. रायुडूचा असाही विश्वास आहे की, पुण्यात जन्मणाऱ्या सलामीवीराचा वर्तमानात भारतीय संघाने खूप कमी वापर केला आहे.
बीयर बायसेप्स पॉडकास्टमध्ये बोलताना रायुडू म्हणाला की, “मला वाटते की, माझ्यासाठी यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये ज्या व्यक्तीचा कमी वापर झाला आहे, तो ऋतुराज गायकवाड आहे. मला वाटते की, त्याच्यात जबरदस्त प्रतिभा आहे. तो एक असा व्यक्ती आहे, ज्याचा जास्त वापर केला गेला पाहिजे. सर्व क्रिकेट प्रकारात संधी दिली पाहिजे. त्याची महानता फक्त त्याच्या प्रतिभेत नाही, तर फलंदाजीतील त्याची अचूक टायमिंग, त्याचे शॉट्स, त्याचा फिटनेस आणि त्याच्या स्वभावात आहे.”
पुढे बोलताना रायुडू असेही म्हणाला की, “त्याच्याकडे जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू बनण्यासाठी सर्वकाही आहे. ऋतुराज खूप शांत आहे. त्याला माहितीये की, तो काय करत आहे. त्याच्यात शांत आक्रमकतेची जबरदस्त भावना आहे. धोनीशी जास्त मिळता-जुळता नाहीये आणि त्याच्याबाबत चांगली बाब अशी की, तो शांत असतो. मला वाटते की, तो भारताचा खूप महत्त्वाचा खेळाडू ठरेल.”
ऋतुराजचे आयपीएल प्रदर्शन
ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत फक्त 4 आयपीएल हंगाम खेळले आहेत. 2019च्या आयपीएल लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने 20 लाखात ताफ्यात सामील केले होते. त्याने पहिल्या हंगामात 6 सामन्यात 204, 2021च्या हंगामात 16 सामन्यात सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. त्यानंतर सीएसकेने 2022च्या मेगा लिलावात त्याला 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्याने 2022च्या हंगामात 14 सामन्यात 368 धावा केल्या होत्या. तसेच, 2023च्या हंगामातही त्याने चांगले प्रदर्शन करत 16 सामन्यात 590 धावा केल्या होत्या.
याव्यतिरिक्त त्याने भारताकडून खेळताना 4 वनडे आणि 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडेत 106 धावा आणि टी20त 458 धावा केल्या आहेत.
रायुडू निवृत्त
अंबाती रायुडूने आयपीएल 2023 (Ambati Rayudu IPL 2023) स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे रायुडू आता आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे त्याला संघातूनही रिलीज करण्यात आले आहे. (neither shubman gill nor shreyas iyer or kl rahul former cricketer ambati rayudu sees future india captain in this player)
हेही वाचा-
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’
World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’