हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत नेपाळनं इंग्लंडचा पराभव करून मोठा अपसेट केला आहे. नेपाळच्या संघानं इंग्लंडचा चक्क एकही गडी न गमावता पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडनं 5.5 षटकांत 6 गडी गमावून 97 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, नेपाळनं 4.2 षटकांत एकही विकेट गमावता हे लक्ष्य गाठलं.
नेपाळकडून संदीप जोरानं सर्वाधिक धावा केल्या. तो 12 चेंडूत 50 धावा करून रिटायर्ड झाला. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. याशिवाय राशिद खान 5 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. राशिद खाननं आपल्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. लोकेश बमनं 11 चेंडूत 20 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 5.5 षटकांत 6 बाद 97 धावा केल्या होत्या. संघाकडून अनुभवी रवी बोपारानं 12 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 1 चौकार आणि 7 षटकार मारले. तर समित पटेल 17 चेंडूत 39 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र, याशिवाय इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी निराशा केली.
इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स डेव्हिस शून्यावर बाद झाला. तर जॉर्डन थॉम्पसन एकही धाव न काढता परत गेला. एडवर्ड जॉर्ज बर्नार्डनं 45 चेंडूत 51 धावा केल्या. रवी बोपारा आणि समित पटेल यांच्याशिवाय इतर इंग्लिश फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेपाळच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, प्रतिश घारती छेत्री हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 2 षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले. नारायण जोशी, लोकेश बम आणि बिबेक यादव यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
आता हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत नेपाळचा पुढील सामना शनिवारी (2 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. शनिवारी नेपाळ आणि अमेरिका यांच्यात सामना होईल. तर सोमवारी नेपाळ आणि स्कॉटलंडचे संघ आमनेसामने येणार आहेत.
हेही वाचा –
लाल कुर्ता, कपाळावर टिळा! महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा VIDEO
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!