शनिवारी(28 सप्टेंबर) नेपाळ विरुद्ध सिंगापूर संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नेपाळने 9 विकेट्सने विजय मिळवला. नेपाळच्या या विजयात कर्णधार(Captain) पारस खाडकाने(Paras Khadka) शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच एक खास विश्वविक्रमही केला आहे.
या सामन्यात सिंगापूरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 151 धावा केल्या होत्या आणि नेपाळला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळकडून पारसने 52 चेंडून नाबाद 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले.
याबरोबरच पारस हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये(T20I) धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्णधाराला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी करता आली नव्हती.
या सामन्यात पारसच्या शतकी खेळीमुळे नेपाळने 16 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 152 धावांचे आव्हान सहज पार केले. पारसला आरिफ शेफने नाबाद 39 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना कर्णधार म्हणून सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रमही पारसच्या नावावर नोंदवला गेला आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ नेदरलँड्सचा पीटर सिलर आहे. त्याने स्कॉटलँड विरुद्ध नाबाद 96 धावांची खेळी केली होती.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे कर्णधार –
106* – पारस खडका (नेपाळ)
96* – पीटर सिलर (नेदरलँड)
91 – पॉल स्टिरलिंग (आयर्लंड)
90 – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
88 – ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
84 – ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)
82 – विराट कोहली (भारत)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या मोठ्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा…
–श्रीलंकेला सापडला दुसरा लसिथ मलिंगा, पहा व्हिडिओ
–दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर लान्स क्लूजनर झाला या मोठ्या संघाचा हेड कोच