आशिया चषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) कॅंडी येथे हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही संघांमधील हा पहिला सामना आहे. या सामन्याआधी नेपाळ संघाचा युवा कर्णधार रोहित पौडेल हा पत्रकारांना सामोरा गेला. त्यावेळी त्याने आपण विराट कोहली व रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंची खूप इज्जत करत असून, सामन्यात त्यांना बाद करण्यासाठी योजना आखत असल्याचे म्हटले.
केवळ वीस वर्षे वयाच्या रोहितच्या खांद्यावर नेपाळच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. नेपाळला या स्पर्धेत आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून मोठा पराभव पहावा लागलेला. तर भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एका गुणावर समाधान मानावे लागलेले. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. नेपाळ संघाला विजय आवश्यक आहे तर भारतीय संघाला एक गुण देखील सुपर फोरमध्ये जाण्यास पुरेसा आहे.
असे असताना सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना रोहित पौडेल म्हणाला,
“आम्ही लहानपणापासून रोहित आणि विराट ला पाहत आलो आहोत. त्यांची कारकीर्द आम्ही पाहिली आहे. त्यांचाच आदर्श आम्ही घेतो. ते क्रिकेटचे खरे सुपरस्टार आहेत. मात्र, यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात मैदानात उतरत आहोत. त्यांना बाद करण्यासाठी आम्ही नक्कीच योजना आखलेल्या आहेत.”
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा व विराट दोघेही चांगली कामगिरी करू शकले नव्हते. रोहित 11 तर विराट केवळ 4 धावांवर बाद झालेला. दोघांना शाहीन आफ्रिदी याने बाद केलेले. त्यामुळे या सामन्यात चांगली फलंदाजी करत पुढील स्पर्धेसाठी आत्मविश्वास मिळवण्याचा दोघेही प्रयत्न करतील.
(Nepal Captain Rohit Paudel Said We Have Plans For Virat Kohli And Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या-
‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या
कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध नेपाळ सामना?, जाणून घ्या लगेच