आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. यामध्ये नेपाळचा फिरकीपटू गोलंदाज संदीप लामिछाने हा दिल्ली संघाचा सदस्य होता. परंतु त्याला या स्पर्धेत त्याला अंतिम अकराच्या संघात संधी मिळाली नव्हती. मात्र, तो सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सहभागी आहे. त्याने या स्पर्धेच्या 10 व्या हंगामात उत्कृष्ट कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यादरम्यान संदीपने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एका प्रश्न उत्तराचे सत्र ठेवले होते. या सत्रात बोलताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
एका चाहत्याने संदीपला विराट कोहलीबद्दल एका शब्दात व्यक्त होण्यासाठी सांगितले. यावर बोलताना युवा गोलंदाज संदीप म्हणाला की, “विराट कोहली अशा दर्जाचा खेळाडू आहे की, त्याच्याबद्दल एका शब्दात व्यक्त होणे अशक्य आहे.”
एका चाहत्याने प्रश्न विचारताना म्हटले, आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल स्पर्धेत खेळताना एकाही सामन्यात संधी दिली नाही, तेव्हा तुला कसे वाटले? यावर उत्तर देताना संदीप म्हणाला, “क्रिकेट एक असा खेळ आहे, जिथे तुम्हाला एका खेळाडूपेक्षा जास्त संघाचे हित महत्त्वाचे असते. आपल्याला नेहमी हा विचार करावा लागतो की, संघासाठी काय योग्य आहे आणि आम्ही ते केले. भले ही प्लेईंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. मात्र, संघासोबत अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय राहिला.”
Do you think i can describe @imVkohli? There is no word to decribe him. He is in that level. 🤗 https://t.co/yLZjzgkawZ
— Sandeep Lamichhane (@Sandeep25) December 23, 2020
संदीपची आतापर्यंतची कामगिरी
संदीप हा नेपाळचा गोलंदाज आहे. तो उजव्या हाताचा फिरकीपटू आहे. त्याने आतापर्यंत नेपाळ संघासाठी 10 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. वनडे त्याने 23 विकेट्स घेतल्या आहेत, त्याचबरोबर टी-20 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत.
संदीप आयपीएल स्पर्धेत भाग घेताना 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 8.34 च्या इकॉनॉमीने 13 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 292 धावा खर्च केल्या आहेत.
दुसरीकडे विराट कोहलीने पालकत्व रजा घेतली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार्या उर्वरित तीन कसोटी सामन्यात भाग घेऊ शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर
‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख
ट्रेंडिंग लेख-
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर