साल २०२१ च्या अखेरीस भारतात ‘पुष्पा: द राईज ‘हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यातील डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाले. त्यातच ‘मै झुकेगा नहीं’ हा डायलॉग आणि पुष्पाची हनुवटीवरून हात फिरवण्याची आयकॉनिक ऍक्शनही बरीच चर्चेत आली. एवढेच काय पण पुष्पाचा फिवर क्रिकेटमध्येही मोठ्या प्रमाणात दिसला. भारताबरोबरच अनेक परदेशी क्रिकेटपटूही पुष्पाच्या आयकॉनिक ऍक्शनसह सेलिब्रेशन करताना दिसले. विशेष म्हणजे जवळपास ६ महिन्यांनंतरही पुष्पा फिवर अजून क्रिकेटमधून उतरला नसल्याचेच दिसले आहे. नुकतेच नेपाळच्या एका महिला क्रिकेटपटूनेही असेच सेलिब्रेशन केले, जे आता चर्चेचा विषय ठरले आहे.
सध्या दुबईमध्ये फेअरब्रेक इनविटेशनल स्पर्धा (FairBreak Invitational Tournament 2022) सुरू आहे. या स्पर्धेत नेपाळची महिला क्रिकेटपटू सीता राणा मगर (Sita Rana Magar) हिने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन (Pushpa Style Celebration) केले आहे. तिने विकेट घेतल्यानंतर मैदानावर पळत पुष्पाची आयकॉनिक ऍक्शन करत सेलिब्रेशन केले. तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयसीसीने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सीता राणा हिने हे सेलिब्रेशन ५ मे रोजी टोरनॅडो आणि सफायर या महिला संघात झालेल्या सामन्यादरम्यान केले. तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे सोशल मीडियावर आता खूप प्रसिद्ध आहे. नेपाळच्या सीता राणा सध्याचे सर्वात लोकप्रिय सेलिब्रेशन करताना.’
“It’s gone so far on social media."
Nepal’s Sita Rana Magar with the most popular celebration currently 😄
📽️ @fairbreakglobal pic.twitter.com/wlTRf0KeFt
— ICC (@ICC) May 10, 2022
सीता राणा फेअरब्रेक इनविटेशनल स्पर्धेत टोरनॅडो संघाकडून खेळत आहे. ५ मे रोजी झालेल्या या सामन्यात टोरनॅडो संघाने १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सीता राणाने एक विकेट घेतली.
फेअरब्रेक इनविटेशनल स्पर्धेत जगभरातील अनेक महिला क्रिकेटपटूंनी सहभाग घेतलेला आहे. ज्यात उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. या स्पर्धेत इंग्लंडची कर्णधार हिथर नाईट, वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलर आणि पाकिसानची क्रिकेटपटू सना मीर अशा प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खान ‘हा’ पराक्रम करणारा जगातील तिसराच गोलंदाज, एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
IPL 2022 | गुजरातने प्लेऑफ गाठले; अन्य ३ जागांसाठी कसे आहे समीकरण, घ्या जाणून
लखनऊला ६२ धावांनी नमवत गुजरात पुन्हा ‘टेबल टॉपर’, बनला प्लेऑफमध्ये पोहोचणारा IPL 2022मधील पहिला संघ