दुबई। शनिवारी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध नेपाळ संघात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात नेपाळने 145 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. नेपाळच्या या विजयात रोहित पावडलने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
त्याने 58 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार मारले. यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने जेव्हा हे शतक केले त्यावेळी त्याचे वय 16 वर्षे 146 दिवस इतके होते. हा विक्रम करताना त्याने जवळ जवळ 29 वर्षीय जूना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
सचिन तेंडुलकरने 16 वर्षे 213 दिवस एवढे वय असताना पाकिस्तान विरुद्ध नोव्हेंबर 1989 मध्ये कसोटीत 59 धावांची खेळी केली होती. हे सचिनचे पहिले अर्धशतक होते.
तसेच वनडेमध्ये 50 आणि 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम शाहिद अफ्रिदीच्या नावावर होता. त्याने 16 वर्षे 217 दिवस एवढे वय असताना 4 ऑक्टोबर 1996 ला श्रीलंकेविरुद्ध 40 चेंडूत 102 धावांची तूफानी खेळी केली होती. त्यावेळी त्याने सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम केला होता. त्याने 37 चेंडूत हे शतक पूर्ण केले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला-पुरुष मिळून सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेची महिला जोहमारी लॉगटेनबर्ग हीच्या नावावर आहे. तीने वयाच्या 14 व्या वर्षीच कसोटी आणि वनडेमध्ये अर्धशतके केली होती.
रोहितने 3 ऑगस्ट 2018 मध्ये नेदरलँड विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तो वनडेमध्ये पदार्पण करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड
–केवळ ३७ सामने खेळणाऱ्या कुलदीप यादवचा झाला तेंडुलकर-कुंबळे या दिग्गजांच्या यादीत समावेश
–एमएस धोनीकडून ब्रायन लारा, कॅलिस या दिग्गजांचा विक्रम मोडीत