---Advertisement---

एमएस धोनीकडून ब्रायन लारा, कॅलिस या दिग्गजांचा विक्रम मोडीत

On: शनिवार, जानेवारी 26, 2019 4:52 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। भारताने आज (26 जानेवारी) बे ओव्हल मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारताने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.

भारताकडून आज यष्टीरक्षक एमएस धोनीने 33 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. याबरोबरच त्याने खास विक्रम केले आहेत.

धोनीच्या आता वनडेमध्ये 337 सामन्यात 51.04 च्या सरासरीने 10414 धावा झाल्या आहेत. यात त्यामुळे त्याने दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा 10405 वनडे धावांचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 11 वे स्थान मिळवले आहे.

विशेष म्हणजे वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 11 फलंदाजांमध्ये 5 भारतीय फलंदाज आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत पहिल्या अकरामध्ये सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली या भारतीय फलंदाजाचांही समावेश आहे.

जॅक कॅलिसच्याही विक्रमाला धोनीने दिला धक्का- 

आजचा सामना हा धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 520 वा सामना होता. त्यामुळे त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत जॅक कॅलिसच्या 519 सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकत सातवे स्थान मिळवले आहे.

#वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले दहा फलंदाज-

18426 धावा – सचिन तेंडुलकर (भारत) – (463 सामने)

14234 धावा – कुमार संघकारा (श्रीलंका)– (404 सामने)

13704 धावा – रिकी पॉटींग (ऑस्ट्रेलिया)– (375 सामने)

13430 धावा – सनथ जयसुर्या (श्रीलंका)– (445 सामने)

12650 धावा – माहेला जयवर्धने (श्रीलंका)–(448 सामने)

11739 धावा – इंजमाम-उल-हक (पाकिस्तान)– (378 सामने)

11579 धावा – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – (328 सामने)

11363 धावा – सौरव गांगुली (भारत)– (311 सामने)

10889 धावा – राहुल द्रविड (भारत)– (344 सामने)

10473 धावा – विराट कोहली (भारत)– (221 सामने)*

10414 धावा – एमएस धोनी (भारत) – (337 सामने)

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

664 सामने – सचिन तेंडुलकर

652 – सामने – माहेला जयवर्धने

594 – सामने – कुमार संगकारा

586 – सामने – सनथ जयसुर्या

560 सामने – रिकी पाँटिंग

524 सामने – शाहीद आफ्रिदी

520 सामने – एमएस धोनी

519 सामने – जॅक कॅलिस

महत्त्वाच्या बातम्या-

प्रजासत्ताक दिनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचा अनोखा पराक्रम

ये जोडी हैं नंबर 1- हिटमॅन-गब्बर जोडीने मोडला सेहवाग- सचिन जोडीचा विक्रम

आजचा प्रजासत्ताक दिन टीम इंडियासाठी या कारणामुळे ठरला खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment