वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातवा सामना सोमवारी (दि. 09 ऑक्टोबर) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने जिंकली असून त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात नेदरलँड (Netherlands) संघात दोन बदल आहेत. सीब्रँड एंजेलब्रेच (Sybrand Engelbrecht) आणि रायन क्लेन (Ryan Klein) यांना संघात घेतले आहे. तसेच, न्यूझीलंड संघात जेम्स नीशम (James Neesham) याच्या जागी लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याला घेतले आहे.
आमने-सामने आकडेवारी
न्यूझीलंड आणि नेदरलँड संघातील आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर हे दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा वनडेत आमने-सामने आले आहेत. यादरम्यान बलाढ्य न्यूझीलंडपुढे नेदरलँडला एकही सामना जिंकता आला नाहीये. चारही सामन्यात न्यूझीलंड संघाने नेदरलँडचा पराभव केला आहे.
तसेच, विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही नेदरलँडला पाकिस्तानविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. अशात या सामन्यात नेदरलँड संघ न्यूझीलंडचा पराभव करण्याचा प्रयत्न करेल. (Netherlands have won the toss and have opted to field against new zealand)
विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
नेदरलँड
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
हेही वाचा-
मागील पराभवाचा वचपा काढणार नेदरलँड? टॉस जिंकत न्यूझीलंडला दिले फलंदाजीचे आमंत्रण, घातक गोलंदाज ताफ्यात
विराटने संपवली सचिनची बादशाहत! ‘या’ विक्रमात ‘मास्टर ब्लास्टर’ला पछाडत बनला जगातला टॉपर फलंदाज