आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड संघात शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी 1.30 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
नाणेफेकीवेळी बोलताना पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) म्हणाला की, “आम्ही आज या सामन्यात 300 हून अधिक धावा करण्याचा प्रयत्न करू.”
Netherlands captain Scott Edwards has won the toss and elected to field in their #CWC23 clash against Pakistan 🏏#PAKvNED | 📝 https://t.co/4Xl8Uqwyjh pic.twitter.com/k4IwJMGenE
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 6, 2023
आमने-सामने आकडेवारी
पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघात विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले गेले आहेत. त्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघ विजयी झाला आहे. विश्वचषक 1996मध्ये पाकिस्तान संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर 2003च्या विश्वचषकात पाकिस्तानने नेदरलँडला एकतर्फी 97 धावांनी पराभूत केले होते. तसेच, वनडे क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तान संघाने नेदरलँडला सर्व 6 सामन्यात पराभवाचं पाणी पाजलं आहे. अशात विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भिडताना कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Netherlands have won the toss and have opted to field against pakistan cwc23 2nd match)
विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान
इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
नेदरलँड्स
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीड, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
हेही वाचा-
‘न्यूझीलंडने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती…’, दारुण पराभवानंतर कर्णधार बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया
आख्ख्या जगाला भारताच्या पहिल्या सामन्याची प्रतीक्षा; कधी आणि कुठे होणार IND vs AUS मॅच? वाचा सर्वकाही