यावर्षी म्हणजेच 2022मध्ये 8 वा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना यूएई विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. हा सामना नेदरलँड्स संघाने 3 विकेट्सने आपल्या खिशात घातला आणि विश्वचषकात विजयी सुरुवात केली. नेदरलँड्सच्या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 111 धावा चोपल्या. खूपच कमी धावांचे हे आव्हान नेदरलँड्स संघाने 3 विकेट्स शिल्लक ठेवत पूर्ण केले. विशेष म्हणजे, नेदरलँड्सच्या मोजक्याच खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना मॅक्स ओडोड याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 18 चेंडूंचा सामना करताना 23 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 3 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन ऍकरमन याने 17 धावा, स्कॉट एडवर्ड्स (नाबाद 16) , टीम प्रिंगल (15) आणि बॅस डी लीड्स याने 14 धावा चोपल्या. इतर एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. मात्र, तरीही संघाने शानदार विजय मिळवला.
An incredible opening day of the #T20WorldCup comes to an end ????
Netherlands cross the finish line in yet another thrilling contest!#UAEvNED |???? https://t.co/N3e40n9zyn pic.twitter.com/zKrht9K8Qc
— T20 World Cup (@T20WorldCup) October 16, 2022
यावेळी यूएईकडून गोलंदाजी करताना जुनैद सिद्दीकी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त बेसिल अहमद, अयान अफजल खान आणि कार्तिक मेयप्पन यांनी प्रत्येकी एका विकेटवर आपले नाव कोरले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना यूएईकडून मुहम्मद वसीम याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 41 धावा केल्या. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त वृत्या अरविंद (18), काशिफ दौड (15) आणि चिराग सुरी (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. इतर एकाही फलंदाजाला 10 धावांचाही आकडा शिवता आला नाही. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
यावेळी नेदरलँड्सकडून गोलंदाजी करताना जुनैद सिद्दीकी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त बेसिल अहमद, अयान अफजल खान, कार्तिक मेयप्पन आणि झहूर खान यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या खिशात घातली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक जिंकून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या हरमनप्रीतच्या मनात बसली ‘ही’ छोटी मुलगी, शॉट्स पाहाच
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू






