---Advertisement---

मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण

---Advertisement---

दुबई। मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात राजस्थानने केवळ २ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी ठरला. या सामन्यानंतर कार्तिक चांगलाच चर्चेत आला. विशेष म्हणजे त्याच्यासह मंगळवारी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा देखील चांगलाच चर्चेत आला.

नक्की काय झाले? 
मंगळवारी राजस्थानने पंजाबसमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. अखेरच्या षटकात त्यांना केवळ ४ धावांची गरज होती आणि ८ विकेट्स शिल्लक होत्या. पण शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या कार्तिक त्यागीने केवळ १ धाव दिली आणि २ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे राजस्थानने या सामन्यात २ धावांनी विजय मिळवला.

त्यामुळे या विजयानंतर अखेरचे षटक टाकणारा कार्तिक त्यागी चर्चेत आला. यावेळी तो जवळपास टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासारखा दिसतो, याकडे अनेक चाहत्यांनी लक्ष वेधले. अनेकांनी याबद्दल गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. तसेच अनेकांनी नीरज आणि कार्तिकचे फोटो कोलाज करत शेअर केले. तर, काहींनी मीम्सही शेअर केले आहेत. त्यामुळे मंगळवारी आयपीएल सामन्यानंतर कार्तिक त्यागीसह नीरज देखील सोशल मीडियावर ट्रेंडिंगला होता.

काहींनी ट्विट केले की ‘मी एकमेव आहे का, ज्याला नीजर चोप्रा आणि कार्तिक त्यागी सारखेच दिसतात?’ तर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की ‘कार्तिक त्यागी केवळ नीरज चोप्रासारखा दिसतच नाही, तर त्याच्यासारखी कामगिरीही करतो.’

https://twitter.com/DhavalBalai/status/1440539809152266251

https://twitter.com/aayusht1802/status/1440394488359186433

https://twitter.com/aktweets0/status/1440392561848303617

कोण आहे नीरज चोप्रा?
यावर्षी टोकियो येथे ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भालाफेक क्रीडाप्रकारात भारताचा खेळाडू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. तो ऍथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतील खेळाडू ठरला. तर, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा भारताचा अभिनव बिंद्रानंतरचा दुसराच खेळाडू ठरला. त्याच्या या यशानंतर तो प्रकाशझोतात आला आहे.

राजस्थानने जिंकला सामना
या सामन्यात १८६ धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवालने १२० धावांची सलामी दिली होती. राहुलने ४९ धावा, तर मयंकने ६७ धावांची खेळी केली होती. तसेच नंतर एडेन मार्करम (२६*) आणि निकोलस पूरन (३२) यांनी ५७ धावांची भागीदारी केली होती. पण अखेरच्या क्षणी कार्तिक त्यागीने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला विजय मिळवता आला नाही. पंजाबला २० षटकांत ४ बाद १८३ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसीने क्रिकेटच्या ‘या’ संज्ञेत केला क्रांतिकारी बदल

विजयानंतरची मस्ती! राजस्थानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर त्यागी-सकारियाच्या शर्टलेस डान्सचा व्हिडिओ व्हायरल

‘मँचेस्टर कसोटीप्रमाणे आयपीएलही रद्द होते का ते पाहू’, मायकेल वॉनची कोपरखळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---