---Advertisement---

‘कधी मुकुटाची पर्वा केली नाही’, जडेजाच्या पत्नीने खास फोटो शेअर करत लिहिली मोठी गोष्ट

Ravindra Jadeja & Rivaba Jadeja
---Advertisement---

विश्वचषक 2023 संपल्यानंतर रवींद्र जडेजा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. जड्डू त्याच्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी चाहत्यांना खूप आवडतो. यासोबतच जडेजा मैदानावर आपल्या अनोख्या सेलिब्रेशनद्वारे चाहत्यांचे खूप मनोरंजन करतो. जेव्हा तो अर्धशतक किंवा शतक झळकावतो तेव्हा तो तलवारीसारखी बॅट हवेत फिरवून आनंद साजरा करतो. दरम्यान, त्याचे दोन फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये जडेजा पत्नी रिवाबा जडेजाला तलवारबाजीची कला शिकवताना दिसत आहे.

शुक्रवारी, (24 नोव्हेंबर) रिवाबा जडेडा (Rivaba Jadeja) हीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोंमध्ये तिच्या हातात तलवार आहे आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मागून तिचा हात धरून त्याला तलवारबाजी शिकवताना दिसत आहे. यावेळी, रिवाबाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, तर जडेजाने टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केले आहे.

रिवाबाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “कधी मुकुटाची पर्वा केली नाही, नेहमी तलवारीला प्राधान्य दिले.”

https://twitter.com/Rivaba4BJP/status/1728094603914670236

भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या पत्नीच्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “अरे, तू वहिनीलाही हे सर्व शिकवत आहेस.”

विश्वचषकातील भारताच्या प्रत्येक सामन्यात रिवाबा स्टँडमध्ये उपस्थित राहून भारतीय संघाचा आणि तिचा पती जडेजा यांचा खूप जयजयकार करत होती. जडेजाच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 11 सामन्यात 24.87 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी 33 धावात 5 विकेट्स अशी होती. जडेजाला फलंदाजीत फारशी संधी मिळाली नाही आणि त्याला केवळ 5 डावात फलंदाजीत योगदान द्यावे लागले. पाच डावांमध्ये त्याने 40 च्या सरासरीने 120 धावा केल्या, ज्यात नाबाद 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतून या अष्टपैलू खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे. (Never cared about the crown Jadeja’s wife shared the photo and wrote a big story)

म्हत्वाच्या बातम्या

भारताच्या पराभवानंतर खूप गाजला ‘पनौती’चा वाद, आता शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा राजकीय अजेंडा…’
‘आतापर्यंतचा सर्वात खराब बॉलिंग अटॅक…’, पाँटिंगने उडवली ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या पाकिस्तान संघाची खिल्ली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---