---Advertisement---

ओव्हलच्या मैदानावर 143 वर्षांनंतर घडणार इतिहास! भारत-ऑस्ट्रेलिया ठरले साक्षीदार

On: बुधवार, जून 7, 2023 10:38 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया लवकरच जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आमनेसामने येतील. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. 2021-2023 दरम्यानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर तर, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ओव्हलच्या मैदानावर मैदानावर रंगणारा हा सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.

हा अंतिम सामना खास करण्याचे कारण म्हणजे तब्बल 143 वर्षानंतर ओव्हल येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कसोटी सामना रंगणार आहे. यापूर्वी 1880 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान हा सामना खेळला गेला होता. त्यानंतर एकदाही या मैदानावर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कसोटी सामना खेळला गेलेला नाही. त्यामुळे या काळात मैदानावर कशी परिस्थिती असते याबाबत कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.

मागील वेळी भारतीय संघाने जून महिन्यातच एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळलेला. द्विपक्षीय मालिकेमध्ये या मैदानावर सर्वात लवकर कसोटी सामना 8 जुलै रोजी खेळला गेला होता. 1982 मध्ये भारत व इंग्लंड या सामन्यात आमने-सामने आले होते. या मैदानावर खेळल्या गेलेल्या आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये 28 वेळा 500 पेक्षा जास्त धावा एका डावात निघाल्या आहेत. तर, नंतर ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल होते. मात्र हे सर्व सामने जुलै व ऑगस्ट महिन्यात खेळले गेले आहेत. त्यामुळे जूनमधील परिस्थिती सर्वांसाठीच नवीन असेल.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या बक्षीसाबद्दल बोलायचे झाले तर, विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, उपविजेत्याला 8 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 6.5 कोटी रुपये मिळतील.

(Never Played Test Match At Oval In Early June Since 1880 Now India And Australia Play In WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---