---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नी म्हणाले, “आता हे मी बदलणारच”

On: मंगळवार, ऑक्टोबर 18, 2022 7:53 PM
---Advertisement---

मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. बिन्नी त्यांची जागा घेतील. मंगळवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सर्वांच्या एकमताने रॉजर बिन्नी बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी आता आपण कोणती कामे करणार आहोत याबाबत खुलासा केला.

बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिन्नी म्हणाले,

“बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. पहिले म्हणजे खेळाडूंना दुखापतींपासून दूर ठेवणे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषकाच्या आधी दुखापत झाली. अशा प्रकारांमुळे संघाच्या संपूर्ण योजनेवर परिणाम होतो. मला अशा गोष्टी थांबवण्यासाठी काम करायचे आहे. दुसरे म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळपट्ट्या तयार करणे. ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेट अधिक स्पर्धात्मक होईल.”

रॉजर बिन्नी हे भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारे पहिले अँग्लो इंडियन होते. ते मूळतः स्कॉटिश वंशाचे आहेत. मध्यमगती गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बिन्नी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीकडे पाहिल्यास दिसून येते की, आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 27 कसोटी सामने खेळताना 47 बळी व 830 धावा केल्या. वनडे क्रिकेटचा विचार केल्यास त्यांच्या नावे 72 सामन्यात 77 बळी व 629 धावा जमा आहेत. भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या विश्वचषकावेळी त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक 18 बळी मिळवलेले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे पहिले संचालकपद भूषवले. त्यानंतर ते भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य देखील होते. ‌‌तसेच, सध्या ते कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल टेनिस स्पर्धेत भक्ती ताजने, स्वानिका रॉय, श्रावणी देशमुख यांची आगेकूच
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---