भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. आतापर्यंत दोन सामने झाले असून, तिसरा सामना आज ट्रेंट ब्रिजवर होणार आहे. ही पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ 3 वनडे सामन्यांची मालिका खेळतील. त्यानंतर भारतीय संघ जिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना होईल.
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून वीव्हीएस लक्ष्मण (V.V. S Laxman) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यानंतर एशियन गेम्समध्येही लक्ष्मणच प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसतील. भारतीय संघ सध्या सतत सामने खेळत आहे. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 19 जुलैला संपणार आहे आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच 23 जुलैपासून जिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका सुरू होत आहे. वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने आणि पुरेशा सुट्ट्या नसल्यामुळे लक्ष्मण यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
वीव्हीएस लक्ष्मण सध्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे (COE) प्रमुख आहेत आणि याआधीही त्यांनी अनेकदा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. जिम्बाब्वे दौरा आणि एशियन गेम्स दरम्यान लक्ष्मण यांच्यासोबत सहकारी प्रशिक्षक म्हणून
सुनील जोशी गोलंदाजी प्रशिक्षकाची तर ऋषिकेश कानितकर फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
येत्या काळात भारतीय संघाचे दोन गट एकाच वेळी खेळताना दिसतील. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय मुख्य संघ गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल, तर एशियन गेम्समध्ये (जे यावेळी जपानमध्ये होत आहेत) वीव्हीएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील संघ टी-20 फॉरमॅटमध्ये सहभागी होईल. यापूर्वी जेव्हा लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती, तेव्हा संघाने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता जिम्बाब्वे दौऱ्यावर आणि एशियन गेम्समध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






