सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) काही कारणास्तव भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षपद निवडणे शक्य नसल्यास या निवडप्रक्रियेत दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव हे महत्त्वाची भुमिका निभावू शकतात.
महिला क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी 30 नोव्हेंबरला संपल्याने हे पद रिक्त आहे. तसेच या पदासाठीचे नवीन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.
याआधी क्रिकेट सल्लागार समितीने(CAC) भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करावी अशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट समीतीची(CoA) इच्छा होती.
नियमानुसार क्रिकेट सल्लागार समितीने या पदासाठीच्या अर्जदारांच्या मुलाखती घेण्याचे ठरवले आहे. मात्र त्या तिघांचीही त्यावेळेस उपस्थित राहण्याची शक्यता कमी असू शकते.
“तेंडूलकर, गांगुली आणि लक्ष्मण यांना प्रशिक्षक निवडण्यात रस असेल तर त्यांनी आम्हाला लेखी कळवावे”, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
तसेच याच सल्लागार समीतीने 2016 मध्ये अनील कुंबळेचीही भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. पण 2017 नंतर या सल्लागार समीतीला कोणतीही शिफारशी विषयी विचारण्यात आलेले नाही. पण त्यांना भारतीय महिला संघासाठी प्रशिक्षकाची नेमणुक करण्यासाठी विचारले जाण्याची शक्यता आहे.
पण जर तेंडूलकर, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या सल्लागार समीतीने नकार दिल्यास सुनील गावसकर, कपिल देव, अशुंमन गायकवाड, शुभांगी कुलकर्णी आणि शांता रंगस्वामी यांची नावे बीसीसीआयने नवीन समिती तयार करण्यासाठी सुचविले आहेत.
गावसकर आणि देव यांचे नेहमीच महिला क्रिकेटबद्दल चांगले मत राहिले आहे. तर गायकवाड आणि कुलकर्णी यांंनीही योग्य भुमिका निभावली अाहे. म्हणून हे या समितीत असण्याची शक्यता अधिक आहे.
महिला भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक हा पोवार यांची जागा घेईल. या पदासाठी अर्जदाराला काही अटीही असणार आहेत. जसे प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 60 पेक्षा जास्त नसावे तसेच त्याला आंतरराष्ट्रीय संघाचे किमान 1 वर्ष किंवा एखाद्या टी20 संघाचे किमान 2 वर्ष प्रशिक्षकपद सांभाळण्याचा अनुभव असला पाहिजे.
मितालीला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते.
याबाबत मितालीने बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता.यामुळे पोवार यांना त्यांचे प्रशिक्षकपद गमवावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या:
–रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका
–अॅडलेड कसोटीसाठी अंतिम १२ जणांच्या टीम इंडियामध्ये या खेळाडूंना मिळाले स्थान