---Advertisement---

शुबमन गिलकडे या संघाचं कर्णधारपद येण्याची शक्यता, BCCI देणार मोठी जबाबदारी!

On: गुरूवार, ऑगस्ट 7, 2025 5:07 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) अलीकडेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करत त्याने प्लेयर ऑफ द सीरिज (Player of the series) चा किताबही पटकावला. केवळ फलंदाजीच नव्हे, तर नेतृत्वगुणांमुळेही त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या नेतृत्वाखाली ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. आता BCCI त्याच्यावर आणखी मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे.

भारतामध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. एएनआय रिपोर्टनुसार, शुबमन गिल नॉर्थ झोनच्या संघाचे नेतृत्व करू शकतो. ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी नॉर्थ झोनचा सामना ईस्ट झोनशी होईल.

ईस्ट झोनच्या नेतृत्वाची जबाबदारी ईशान किशनकडे (ishaan kishan) सोपवण्यात आली आहे, जो सध्या भारतीय संघापासून दूर आहे. तसेच वेस्ट झोनचा कर्णधार शार्दूल ठाकूर (Shardul thakur) असेल. भारताचे अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

इंग्लंड दौऱ्याच्या आधी गिलला पहिल्यांदाच भारताच्या टेस्ट संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांमध्ये त्याने 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं, त्यात ही एक 269 धावांची खेळी केली होती.

दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे झोन

नॉर्थ झोन

साउथ झोन

ईस्ट झोन

वेस्ट झोन

सेंट्रल झोन

नॉर्थ-ईस्ट झोन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---