---Advertisement---

का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर

On: सोमवार, सप्टेंबर 19, 2022 5:17 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची जर्सी बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंनी याचा प्रोमो देखील शूट केला होता. त्यानंतर रविवारी (18 सप्टेंबर) या जर्सीच्या अनावरण करण्यात आले. जर्सीची निर्माते असलेल्या एमपीएल स्पोर्ट्सने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे मुंबईतील एका कार्यक्रमात ही जर्सी लॉन्च केली. या जर्सी मागील नक्की संकल्पना काय होती, याचा खुलासा आता झाला आहे.

https://www.instagram.com/p/CiptootIarN/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाआधी भारतीय संघ आपली नवी जर्सी लॉन्च करणार होता. सर्व संघ नियमितपणे प्रत्येक विश्वचषकाआधी नवी जर्सी बनवत असतात. 2020 पासून भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर एमपीएल स्पोर्ट्स आहेत. त्यांनीच ही नवी जर्सी बनवली. ही जर्सी अधिकतर आकाशी निळ्या रंगाची असून, 2020 नंतर प्रथमच भारतीय संघ अशी जर्सी परिधान करेल. तसेच खांद्यावर गडद निळ्या रंगाचा भाग राहील. तसेच जर्सीच्या डाव्या बाजूला काही गडद निळ्या रंगाच्या पाकळ्यांचा आकार दिसून येत आहेत. तसेच समोरच्या आकाशी निळ्या भागावर काही त्रिकोणी आकृत्या डिझाईन केलेल्या दिसतायेत.

एमपीएल स्पोर्ट्सने या जर्सीची संकल्पना सांगताना म्हटले, ‘हर फॅन की जर्सी असे याला नाव दिले गेले होते. जर्सी वर दिसणाऱ्या पाकळ्या या बीसीसीआयच्या लोगोवरून घेतल्या आहेत. ज्या आम्हाला गुणवत्ता आणि प्रामाणिकतेचे प्रतीक वाटतात. तर त्रिकोण हे चाहत्यांसाठी आहेत. हे त्रिकोण चाहत्यांचा उत्साह, ऊर्जा आणि शक्ती दर्शवतात. तसेच बीसीसीआयच्या लोगोवर दिसणारे तीन स्टार 1983, 2007 व 2011 या भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषकाचे प्रतिनिधित्व करतात.

भारतीय संघ 2021 टी20 विश्वचषकापासून वनडे व टी20 साठी एकच जर्सी वापरायचा. मात्र, आता ही नवी जर्सी केवळ टी20 क्रिकेटसाठी वापरली जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---