येत्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टी२० संघाची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर कर्णधार केन विलियम्सन पहिल्या टी२० सामन्यासाठी अनुपस्थित असेल. एवढेच नाही तर, या टी२० मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक नव्हे तर २ संघांची निवड केली आहे. पहिल्या टी२० सामन्यासाठी वेगळा आणि दुसऱ्या व तिसऱ्या टी२० सामन्यासाठी वेगळा संघ असणार आहे.
न्यूझीलंड टी२० संघाचा नियमित कर्णधार विलियम्सन याची पत्नी गरोदर असल्यामुळे तो पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित असेल. तो सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध चालू असलेल्या न्यूझीलंड संघाच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचाही भाग नाही. त्यामुळे मिचेल सेंटनर पहिल्या टी२० सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल. परंतु, पुढील २ टी२० सामन्यांमध्ये विलियम्सनच संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळेल.
असे आहे टी२० मालिकेचे वेळापत्रक
सध्या न्यूझीलंड संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही मालिका संपल्यानंतर तीन दिवसांमध्येच म्हणजे १८ डिसेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० मालिकेची सुरुवात होईल. पहिला टी२० सामना ऑकलँड येथे खेळण्यात येईल. तर हॅमिल्टन येथे २० डिसेंबर रोजी दुसरा आणि नॅपियर येथे २२ डिसेंबर रोजी तिसरा व शेवटचा टी२० सामना खेळला जाईल.
न्यूझीलंडचा टी२० संघ
पहिला सामना– मिचेल सेंटनर (कर्णधार), डग ब्रेसवेल, टोड ऍस्टल, मार्क चॅपमन, डेवोन कॉनवे, जॅकोब डफी, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुग्लेन, जिमी नीशन, ग्लेन फिलिप्स, टिम साइफर्ट, इश सोढी, ब्लेर टिकनेर
उर्वरित २ सामने– केन विलियमसन (कर्णधार), टोड एस्टल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉनवे, मार्टिन गप्टिल, कायल जेमिसन, स्कॉट कुग्लेन, डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, टिम साइफर्ट, इश सोढी, टिम साउदी
महत्त्वाच्या बातम्या-
Ind vs Aus A: शुभमन गिलचे दमदार अर्धशतक, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत
विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?






