---Advertisement---

पुन्हा मौका-मौका! स्टार स्पोर्ट्सने रिलीज केले विश्वचषकासाठी नवीन गाणे; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 6:55 PM
---Advertisement---

आयपीएल आपल्या अखेरच्या टप्प्याकडे आली असतानाच सर्व क्रिकेटप्रेमींना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. आयपीएल संपताच अवघ्या दोन दिवसांमध्ये विश्वचषकाचे बिगुल वाजेल. या विश्वचषकातील सर्वात बहुचर्चित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होईल. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात हे परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने येतील. तत्पूर्वी, दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय असलेल्या ‘मौका-मौका’ गाण्याची नवीन आवृत्ती रिलीज केली गेली आहे. ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभतोय.

नवा मौका-मौका
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. या दोन संघांमधील सामना नेहमीच हाय-व्होल्टेज ठरतो. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याची सर्व संघ आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्याआधी, टी२० विश्वचषकाचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने प्रसिद्ध ‘मौका – मौका’ गाणे रिलीज केले आहे. २०१५ च्या वनडे विश्वचषकादरम्यान हे गीत खूप लोकप्रिय झाले होते.
त्यानंतर, प्रत्येकवेळी भारत आणि पाकिस्तान विश्वचषकात भिडतात, तेव्हा हे गाणे नक्कीच वेगळ्या पद्धतीने सादर केले जाते आणि या वेळीही हे गाणे अतिशय अनोख्या पद्धतीने सादर केले गेले आहे. तुम्ही हे नवीन ‘मौका – मौका’ गाणे पाहू शकता.

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य
भारतीय संघाने प्रत्येक वेळी विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने टी२० विश्वचषकात पाकिस्तानचा पाच वेळा पराभव केला आहे आणि यावेळी संघाच्या नजरा विजयाच्या षटकारावर असतील. त्याचबरोबर वनडे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला कधीही जिंकू दिले नाही.
टी२० विश्वचषकासाठी पात्रता सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होतील. सहा दिवसांनंतर, मुख्य स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने सुरू होईल. भारतीय संघाला गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघही समाविष्ट आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---