एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची सध्या वाताहात झालेली दिसते. दोन वेळा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाला आता वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाला या महत्त्वपूर्ण स्पर्धेआधी नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. वेस्ट इंडीजला दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी हा ही भूमिका निभावेल. आता संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवण्यासाठी त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
वनडे विश्वचषक पात्रता फेरीआधी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सॅमी याला प्रशिक्षक म्हणून संधी दिली. त्यानंतर त्याने आता थेट अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले आंद्रे रसेल, सुनील नरीन, एविन लुईस व शिमरन हेटमायर यांच्याशी त्याने चर्चा केली आहे. तसेच तो या खेळाडूंच्या पुनरागमनासाठी आग्रही असल्याचे सांगितले जातेय. असे झाल्यास या अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा संघात संधी मिळेल.
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या सुनील नरीनने 2019 पासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तर, रसेल 2021 टी20 विश्वचषकापासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. हेटमायरला शिस्तभंगाच्या कारवाईमुळे मागील वर्षापासून राष्ट्रीय संघात जागा मिळाली नाही. तर, लुईस याने काही काळापूर्वी स्वतः आपण निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे म्हटलेले. परंतु, आता हे खेळाडू पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतात.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वनडे विश्वचषक क्वालिफायर्ससाठी यापूर्वीच संघाची घोषणा केली आहे. मागील काही काळापासून चांगली कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना संधी देण्याचे बोर्डाने म्हटले होते.
(New West Indies Coach Darren Sammy Want Narine Russell Hetmyer And Lewis In West Indies Team For ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video
आयपीएल फायनलपूर्वीच सीएसकेच्या महत्वपूर्ण सदस्याने म्हटले ‘थँक्यू’, भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले…