इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये पॉवर हिटर्सचा भडीमार आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाकडेही असाच एक पॉवर हिटर आहे, जो गोलंदाजांना घाम फोडल्याशिवाय राहत नाही. तो इतर कुणी नसून शिवम दुबे आहे. जेव्हा तो षटकार मारतो, तेव्हा न थांबता मारतच राहतो. तो सहजरीत्या 100 मीटर लांबीचा षटकार मारतो. अंतिम सामन्यापूर्वी तो याच अंदाजात सराव करत आहे. नेट्समध्ये त्याने प्रत्येक दिशेला शॉट्स मारले आणि चेंडू थेट षटकारासाठी पाठवला. म्हणजेच तो आता गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठ सज्ज झाला आहे.
शिवम दुबे (Shivam Dube) याचा नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दुबे सहजरीत्या षटकार मारताना दिसत आहे. तसेच, त्याच्या बॅटमधून चेंडू गोळीच्या वेगाने निघताना दिसत आहे. त्याने सराव सत्रादरम्यान मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात षटकार मारला.
शिवम दुबे याची ही पॉवर हिटिंग गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचे टेन्शन वाढवण्यासाठी पुरेशी आहे. कारण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे सहजरीत्या धावा केल्या जातात. तसेच, शुबमन गिल (Shubman Gill) याचा मोठा पुरावा आहे. त्याने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 धावा करत शतक झळकावले होते. त्याच्या खेळीत त्याने 10 षटकारांची बरसात केली होती.
दुबेच्या या हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. त्याने आतापर्यंत 33 षटकार मारले आहेत. गिलचेही इतकेच षटकार आहेत. पहिल्या क्रमांकावर आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. त्याने सर्वाधिक 36 षटकार मारले आहेत. म्हणजेच आता दुबेकडे फाफचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आता तो हा कारनामा करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (power hitter shivam dube hit sixes during practice session ahead of csk vs gt ipl 2023 final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कपिल पाजींची शुबमन गिलला वॉर्निंग! म्हणाले, ‘सचिन-विराटच्या दर्जाचा नाही, फॉर्म गेल्यावर…’
IPL फायनलमध्ये धोनीचा घाबरवणारा रेकॉर्ड! एकाच कर्णधाराकडून 3 वेळा हारलाय ‘थाला’, गंभीरनेही दिलेली मात