---Advertisement---

ब्रेकिंग! नको तेच घडल… आयपीएल फायनल होणार रद्द? लाखो प्रेक्षक घरी जाण्याच्या तयारीत

MS Dhoni Hardik Pandya
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) रात्री खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. प्रत्येकजण हा सामना घासून झाला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत आहे. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर ऐन वेळी पावसाने हजेरी लावली, तर चाहते आणि दोन्ही संघांची चांगलीच निराशा होऊ शकते. दुर्दैवाने पावसामुळे सामना रद्द झाला, तर विजेतेपद कोणाला मिळणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. चला तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये काही सामन्यांदरम्यान पावसाने मैदानात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर दोनमध्येही पावसाने हजेरी लावली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला होता. आता दोन दिवसानंतर अहमदाबादमध्येच आयपीएलचा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे. अशात सीएशके आणि गुजरात संघ आमने सामने असताना पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बऱ्याच चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, चेन्नई आणि गुजरातमधील सामना पावसामुळे रद्द झाला, तर आयपीएल ट्रॉफी कोणत्या संघाकडे जाईल.

आयपीएलचा अंतिम सामना रद्द झाला तर?
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवला गेला, जेणेकरून रविवारचा सामना रद्द झाला, तर सोमवारी हा सामना पुन्हा आयोजित करता येईल. रविवारी समजा पाऊस आला, तर सामना निकाली निघण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच-पाच षटके खेळावे लागणार आहेत. पावस थांबण्याासठी आयपीएल व्यवस्थापनाकडून रात्री 12.26 मिनिटांपर्यंत वाट पाहिली जाईल. जर तोपर्यंत पाऊस थांबला नाही, तर सामना सोमवारी आयोजित केला जाईल.

रविवारी जर सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पाऊस आला असेल आणि पुढचे खेळ झाला नाही, तर सोमवारी हा सामना जिथे थांबला तुथून सुरू होईल. पण रविवारी फक्त नाणेफेक झाली आणि पहिला चेंडू टाकण्याआधीच पाऊस आला. तर सोमवारी पुन्हा नाणेफेक होईल आणि संघ नवीन प्लेइंग इलेव्हन निवडू शकतील.

सोमवारीही पावसाने हजेरी लावली तर?
सोमवारी राखीव दिवसीही पावसाने सामन्यावेळी हजेरी लावली, तरीही व्यवस्थापनाकडून त्याचे नियोजन केले जेगे आहे. सोमवारीही जर किमान पाच-पाच षटकांचा सामना खेळवता आला नाही, तर गुजरात टायटन्सला विजेतेपद दिले जाईल. कारण साखळी फेरीनंतर गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या स्थानी होती. सोमवारी आयोजित सामन्याचा निकाल सुपर ओव्हच्या माध्यमातूनही ठरू शकतो. पण त्यासाठी जास्तीत जास्त रात्री 1.20 वाजेपर्यंत व्यवस्थापन वाट हाईल. त्यानंतर मात्र गुजरातला विजेतेपद दिले जाईल. (What if it rains in the CSK-Gujarat match? Find out which team will win the title)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसी फायनसाठी यशस्वी जयस्वालची संघात निवड, जाणून घ्या का मिळाली ऋतुराजच्या जागी संधी
IPL Finalमध्ये गावसकर कुणाच्या बाजूने? उत्तर ऐकून ‘या’ टीमचे फॅन्स होतील नाराज; म्हणाले, ‘माझ्या मनाला…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---