इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना रविवारी (दि. ०५ जून) संपुष्टात आला. या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना १० जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम याला दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही.
कॉलिन डी ग्रँडहोम (Colin De Grandhomme) याच्या उजव्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत ग्रँडहोमला दुखापत झाली होती आणि तो १०-१२ आठवडे बाहेर राहू शकतो.
Colin de Grandhomme has been ruled out of the remainder of the Test series against England after a scan revealed a tear to his right plantar fascia (heel). Michael Bracewell has been added for the remainder of the series as de Grandhomme’s replacement.https://t.co/meXfIVLfBs
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 6, 2022
मायकल ब्रेसवेल दुखापतग्रस्त हेन्री निकोल्सच्या कव्हर खेळाडूच्या रूपात लंडन येथे न्यूझीलंड संघासोबत आहे. त्यामुळे तो आता संघात कायम राहील. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले की, “मालिकेच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त होणे कॉलिनसाठी खूपच निराशाजनक आहे. तो आमच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तसेच, निश्चितच त्याची कमतरता आम्हाला नक्कीच भासेल.”