भारतीय संघ पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या दौऱ्याला 24 जानेवारीपासून टी20 मालिकेने सुरुवात होईल.
या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात दुखापतीनंतर कर्णधार केन विलियम्सनचे पुनरागमन झाले आहे. तसेच वेगवान गोलंदाज हमिश बेनेटलाही न्यूझीलंड संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे 2017 नंतर तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मात्र ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्यूसन हे न्यूझीलंडचे नियमित वेगवान गोलंदाज सध्या दुखापतीतून सावरत असल्याने त्यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
त्याचबरोबर या टी20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी कॉलिन डी ग्रँडहोमला न्यूझीलंड संघात संधी दिली आहे. तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी त्याच्याऐवजी टॉम ब्रुसची निवड करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त न्यूझीलंड संघात टीम साऊथी, मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रोस रॉस टेलर, इश सोधी, मिशेल सँटेनर या नियमित खेळाडूंचा समावेश आहे.
या टी20 मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचीही निवड झाली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील ही टी20 मालिका 2 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान वनडे मालिका होईल. तसेच त्यानंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. वनडे आणि कसोटीसाठी अजून दोन्हीही संघांची घोषणा झालेली नाही.
टी20 मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंड संघ –
केन विलियम्सन (कर्णधार), हमीश बेनेट, कॉलिन डी ग्रँडहॉमे (सामने 1-3), टॉम ब्रूस (सामने 4-5), मार्टिन गप्टिल, स्कॉट कुग्लेइझन, डॅरेल मिशेल, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी, टिम साऊथी
भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू झाला संघाबाहेर
वाचा????https://t.co/DkewLnlyrA????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvAUS— Maha Sports (@Maha_Sports) January 16, 2020
टीम इंडियासाठी खूशखबर, हा खेळाडू पुनरागमनासाठी झाला सज्ज, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/nvhjjbVVbe????#म #मराठी #Cricket #TeamIndia @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020