वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत धमाल प्रदर्शन करणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू रचिन रवींद्र याच्या नावाचाही समावेश आहे. उदयोन्मुख रचिनचे विश्वचषकातील प्रदर्शन पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी म्हणत आहे की, रचिनला आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावात आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझी संघ एकमेकांशी भिडतील. मात्र, रचिनचे याविषयी वेगळे मत आहे. त्याने म्हटले आहे की, आयपीएलमध्ये घेतले जाईल की नाही, याची कोणतीही हमी नाही.
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रचिन रवींद्र (Rachin Ravindra) म्हणाला की, आयुष्य आणि क्रिकेटमध्ये कोणतीही खात्री नाहीये. रचिन म्हणाला, “लोक काय म्हणतात किंवा रिपोर्ट्समध्ये काय म्हटले जात आहे, यापेक्षा मला वाटते की, जे महत्त्वाचे आहे, ते हे आहे की, तुमच्यापुढे कोणती मालिका आहे. आयपीएलसाठी अजून बराच काळ बाकी आहे. याची कोणतीही खात्री नाहीये की, मला निवडले जाईल. आयुष्य आणि क्रिकेटमध्ये कोणतीही खात्री हमी नाहीये. माझे लक्ष फक्त त्यावर आहे, जे माझ्यापुढे आहे- बांगलादेश कसोटी मालिका. तुम्ही वर्तमानात राहता, तुम्ही त्या क्षणाचा आनंद घेता. मला न्यूझीलंडसाठी खेळण्याची जी काही संधी मिळते, मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे.”
रचिन हेही सांगितले की, त्याला वडिलांच्या प्रेमामुळे त्याला क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची प्रेरणा कशी मिळाली. तो म्हणाला, “मला असे वाटते की, वडील क्रिकेट खेळायचे, खूप क्रिकेट पाहायचे, प्लेस्टेशनवरही खेळायचे. हे प्रत्येक वेळी घराच्या आसपास सुरू असायचे. स्वाभाविकरीत्या मी हे अंगिकारले. आई आणि वडील नेहमी मला प्लॅस्टिकचे चेंडू टाकायचे. मला नेहमी फलंदाजी किंवा गोलंदाजी करायची होती. यामुळेच आज मी इथे आहे. त्यांनी मला कधीच क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त केले नाही. हे स्वाभाविकरीत्या घडले. मला माझ्या सहकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्यात मजा आली. मला प्रत्येक दिवशी नेट्सवर जाणे, हिट करणे आणि चेंडू टाकणे चांगले वाटायचे. मला वाटते की, असेच झाले असेल.”
रचिनचे विश्वचषकातील प्रदर्शन
आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत रचिनने चांगले प्रदर्शन केले. त्याने 10 सामन्यात 106.44च्या स्ट्राईक रेटने 3 शतके आणि 2 अर्धशतक ठोकत 578 धावा केल्या. याव्यतिरिक्त रचिनने गोलंदाजी करताना 5 विकेट्सही नावावर केल्या. (new zealand batter rachin ravindra on ipl 2024 gave big statement must know here)
हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’