---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम

On: शनिवार, जून 1, 2019 8:27 PM
---Advertisement---

कार्डिफ। आज विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडल विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 10 विकेट्सने विजय मिळवत त्यांची विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. याबरोबरच त्यांनी एक खास विक्रमही नोंदवला आहे.

न्यूझीलंडचा विश्वचषकात 10 विकेट्सने मिळवलेला हा तिसरा विजय ठरला आहे. त्यामुळे विश्वचषकामध्ये 10 विकेट्सने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही न्यूझीलंडच्या नावावर झाला आहे.

त्यांनी यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात दोन वेळा 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. यातील पहिला विजय त्यांनी चेन्नईमध्ये केनियाविरुद्ध तर दुसरा विजय झिम्बाब्वे विरुद्ध अहमदाबादला झालेल्या सामन्यात मिळवला होता.

तसेच विश्वचषकात एखाद्या संघाने 10 विकेट्सने विजय मिळवण्याची ही 12 वी वेळ होती.

न्यूझीलंड पाठोपाठ विश्वचषकात सर्वाधिक वेळा 10 विकेट्सने विजय मिळवण्याच्या यादीत विंडीज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 2 वेळा 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने असा कारनामा प्रत्येकी 1 वेळा केला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघांतील सामन्यात थोडक्यात आढावा – 

आज पार पडलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 29.2 षटकात सर्वबाद 136 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाबाद 52 धावांची अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. पण त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. फक्त थिसरा परेराने 27 धावा करत थोडी साथ दिली.

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मिशेल सँटेनर , जेम्स निशाम, कॉलिन डी ग्रँडहोम आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यांनतर 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर फलंदाज कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टिलने नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि न्यूझीलंडला 16.1 षटकातच सहज विजय मिळवून दिला.

मुनरोने 47 चेंडूत 6 चौकार 1 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 58 धावांची खेळी केली. तर गप्टिलने 51 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

विश्वचषकात सर्वाधिक वेळा 10 विकेट्सने विजय मिळवणारे संघ – 

3 – न्यूझीलंड

2 – श्रीलंका, विंडीज, दक्षिण आफ्रिका

1 – भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: या कारणामुळे आयोजकांना मागावी लागली चाहत्यांची माफी, तिकीटांचे पैसेही करणार परत

 तब्बल १८३५ झेल आणि ८८५१ मीटरचा प्रवास करत आला आजच्या सामन्यातील चेंडू, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: या दिग्गज खेळाडूने वर्तवले सर्व १० संघांचे भविष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment