न्यूझीलँड क्रिकेट संघाने पाकिस्तानसोबतची मर्यादित षटकांची मालिका रद्द केली आहे. न्यूझीलँडने हा निर्णय ऐन सामना सुरू होण्याच्या पाच मिनिट आधी घेतला आणि मालिका रद्द केल्याची घोषणा केली. न्यूझीलँडने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला त्यांच्याकडून या निर्णयाची अपेक्षा नव्हती. त्यांच्या या कृत्यानंतर क्रिकेटविश्वात पाकिस्तानचे नाक कापले गेले आहे. सध्या पाकिस्तान संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
महत्त्वाते म्हणजे, त्यांचे ट्रोल होण्यामागचे कारण अतिशय मजेशीर आहे. त्याचे झाले असे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) न्यूझीलंडच्या या तडकाफडकी आणि अनपेक्षित निर्णयानंतर त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून एक ट्वीट केले, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
पीसीबीने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आम्ही हमी दिली होती. मात्र त्यांनी एकतर्फी निर्णय घेत मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारने आमच्या देशात येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षेचे FOOL प्रुफ नियोजन केले आहे.”
Earlier today, the New Zealand cricket board informed us that they had been alerted to some security alert and have unilaterally decided to postpone the series.
PCB and Govt of Pakistan made fool proof security arrangements for all visiting teams. 1/4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 17, 2021
पीसीबीने त्यांच्या ट्वीटमध्ये इंग्रजीमध्ये full च्या जागी fool असे लिहिले आहे. fool या शब्दाचा अर्थ मुर्ख असा होतो. पीसीबीने ट्वीटमध्ये केलेली ही चूक नेटकऱ्यांच्या तत्काळ लक्षात आली आणि याचमुळे त्यांनी पीसीबीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ये Fool Proof कोई नया शब्द है या मेरी अंग्रेजी ज्यादा ही कमजोर है! pic.twitter.com/lBjrekefZK
— Amit (@AmitKeMit) September 17, 2021
एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तुमची fool प्रुफ सुरक्षा पाहूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल.’ तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘fool होती म्हणूनच ते पळून गेले, full प्रुफ असती तर गेले नसते.’
Full Proof security hoti to shayad khel lete…'Fool proof ' se dar gaye honge
— Manish Chiranjiv (@Chiranjivmanish) September 17, 2021
Fool proof bhi hota hai kya? pic.twitter.com/ShnjxP0KR5
— ????????????Ramesh Kumar???????????? (@vvrameshkumar) September 17, 2021
दरम्यान, न्युझीलँड क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या ठीक आधी एक घोषणा केली की, “न्यूझीलँड सरकारकडून पाकिस्तानमधील धोका पाहता आणि बोर्ड सुरक्षा सल्लागाराच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला गेला आहे. आता न्यूझीलँडचा संघ दौरा पुढे कायम करणार नाही.” न्यूझीलँडच्या संघाला पाकिस्तानच्या दौऱ्यात पाच टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या होत्या. तब्बल १८ वर्षांनंतर ते पाकिस्तान दौऱ्यावर आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! न्यूझीलंडनंतर आणखी एक देश पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या तयारीत
न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’
दौरा रद्द केल्याने संतापले रमीज राजा, न्यूझीलंड बोर्डाला दिली धमकी






