ख्राईस्टचर्च। बुधवारी(६ जानेवारी) न्यूझीलंडने पाकिस्तान संघाला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि १७६ धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने पहिला सामनाही जिंकला असल्याने ही मालिका २-० अशी जिंकली आणि पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. याबरोबरच न्यूझीलंडने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावत इतिहास रचला आहे.
न्यूझीलंडचा हा सलग सहावा कसोटी विजय होता. याबरोबरच त्यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्याची ही न्यूझीलंडची पहिलीच वेळ आहे. त्यांचे आता ११८ गुण झाले असून ऑस्ट्रेलियाला त्यांनी २ गुणांनी मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचे ११६ गुण आहेत. या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताचे ११४ गुण आहेत.
🇳🇿 NEW ZEALAND ARE NO.1️⃣🎉
Victory over Pakistan has sent Kane Williamson's side to the 🔝 of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
They have achieved the feat for the first time in rankings history 👏 pic.twitter.com/8lKm6HebtO
— ICC (@ICC) January 6, 2021
न्यूझीलंडचा सगल ६ वा विजय –
न्यूझीलंडने मागीलवर्षी भारताला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देत विजयी रथ अग्रेसर केला होता. त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिजलाही २-० असे कसोटी मालिकेत पराभूत केले आणि आता पाकिस्तानलाही पराभूत केले आहे. त्यांच्या या विजयामुळे त्यांना कसोटीत अव्वल क्रमांक मिळवता आला आहे.
The moment @BLACKCAPS became No.1 🙌#NZvPAK | #WTC21 https://t.co/i1kpzTRhxq
— ICC (@ICC) January 6, 2021
विलियम्सन – जेमिसन चमकले –
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पाकिस्तानला पहिल्या डावात २९७ धावांवर सर्वबाद केले होते. यावेळी जेमिसनने ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडने केन विलियम्सनच्या २३८ धावांच्या द्विशतकी खेळीच्या, तसेच हेन्री निकोल्स(१५७) आणि डॅरिल मिशेल(१०२*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव ६ बाद ६५९ धावांवर घोषित केला. त्याबरोबरच ३६२ धावांची भक्कम आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा जेमिसनच्या गोलंदाजीसमोर ढेपाळला. जेमिसनने या डावात ६ विकेट्स घेत पाकिस्तानला १८६ धावांवर सर्वबाद करण्यात मोलाचा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलिया-भारताला नंबर वन बनण्याची संधी –
न्यूझीलंडने जरी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला असला तरी ऑस्ट्रेलिया आणि भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याची संधी आहे. कारण सध्या या दोन संघांमध्ये कसोटी मालिका सुरु असून अजून २ सामने बाकी आहेत. या कसोटी मालिकेत जर भारताने ३-१ ने विजय मिळवला तर भारताला अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे. तसेच जर ऑस्ट्रेलियाने २-१ किंवा ३-१ ने मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर येईल.
याशिवाय जर मालिकेत बरोबरी झाली, तर मात्र न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर कायम राहिल. सध्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारताने प्रत्येकी १ विजय मिळवला असल्याने पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी कोहली-पंड्यावर प्रोटोकॉल तोडल्याचा केलेला आरोप कितपत खरा, घ्या जाणून
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत करणार ओपनिंग, मग कुणाला मिळेल डच्चू ?