दुबई | न्यूझीलंड संघाने पाकिस्तानवर २-१ असा विजय मिळविल्यामुळे ते आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानी आले आहेतर तर पाकिस्तान संघाची मात्र ६व्या स्थानावरुन ७व्या स्थानी घसरण झाली आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मालिकेपुर्वी न्यूझीलंड संघाचे १०२ गुण होते परंतु या मालिकाविजयामुळे त्यांचे १०५ गुण झाले आणि ते चौथ्या स्थानी विराजमान झाले.
दुसऱ्या बाजूला या मालिकेपुर्वी पाकिस्तान संघाचे ९५ गुण होते परंतु पराभवामुळे त्यांचे ९२ गुण झाले आणि ते ६व्या स्थानावरुन ७व्या स्थानी फेकले गेले.
यानंतर आयसीसी क्रमवारी थेट न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर घोषीत होणार आहे. जर न्यूझीलंडने ती मालिका जिंकली तर ते १०९ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान होतील. जर या मालिकेत ते ०-२ असे पराभूत झाले तर ते ९९ गुणांसह ते पाचव्या स्थानावर जातील.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना १५ ते २० डिसेंबर या काळात वेलिंग्टनला तर दुसरा सामना २६ ते ३० डिसेंबर या काळात ख्राईस्टचर्चला होणार आहे. ताजी आयसीसी कसोटी क्रमवारी
महत्त्वाच्या बातम्या:
–ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले
–आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव