बेंगळुरूमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कब्जा केला आहे. पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 259 धावा केल्यानंतर न्यूझीलंड संघाने भारताला 156 धावांत गुंडाळले. यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावत 198 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण आघाडी 301 धावांची झाली आहे.
भारतात गेल्या 16 वर्षात कसोटी सामन्यांमध्ये 280 धावांपेक्षा मोठी धावसंख्या गाठली गेली नाही. अशा स्थितीत रोहित ब्रिगेडला 300 धावांपेक्षा मोठे लक्ष्य जिंकणे सोपे नसेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. भारताला अंतिम सामना खेळायचा असेल तर त्यांना शेवटच्या 7 कसोटी सामन्यांपैकी किमान 4 सामने जिंकावे लागतील. यामध्ये पुणे कसोटीचाही समावेश आहे. जर भारत पुण्यात हरला तर त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 4 कसोटी जिंकाव्या लागतील. हे करणे अजिबात सोपे जाणार नाही. कारण भारताचा पुढील दौरा ऑस्ट्रेलियाचा आहे. भारताने पुण्यासह उर्वरित 7 कसोटी सामन्यांपैकी 4 सामने जिंकले नाहीत, तर त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खूप महत्त्वाची असेल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षी नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारताला या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील किमान 3 सामने जिंकावे लागतील. यासोबतच ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मुंबई कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव होईल याची खात्री करावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेला फायदा होईल
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने गमावल्यास त्याचा थेट फायदा दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये होणार आहे. जागतिक कसोॉी चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी आफ्रिकन संघाला 5 सामने खेळायचे आहेत. यातील 4 सामने त्यांना त्यांच्या भूमीवर श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहेत. या दोन्ही मालिकेत दक्षिण आफ्रिका विजयाचा दावेदार असू शकतो. आफ्रिकन संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
श्रीलंकेचाही खेळ खराब होऊ शकतो
दक्षिण आफ्रिका (47.62) सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. जर त्याने त्याचे उर्वरित 4 किंवा 5 सामने जिंकले तर त्याच्या गुणतालिकेत 62.00 पेक्षा जास्त विजयी टक्केवारी गुण असतील. भारत सध्या 68.06 विजयी टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया (62.50) दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावला तर त्यांची विजयाची टक्केवारी 63.00 च्या जवळ जाऊ शकते. अशा स्थितीत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (55.56) सारख्या संघांची कामगिरी देखील गुणतालिकेत अव्वल-2 संघ कोण असतील आणि कोणत्या संघांत अंतिम सामना खेळवला जाईल, हे ठरवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावू शकतो भारतीय संघ?
वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी