---Advertisement---

IND vs NZ; 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावू शकतो भारतीय संघ?

On: शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024 2:33 PM
---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. आता दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जात आहे. त्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरताना दिसली. भारतीय संघ अवघ्या 156 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघावर सध्या घरच्या मैदानावर 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावण्याचा धोका दिसत आहे.

पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी आहे. पुण्याच्या टर्निंग खेळपट्टीवर 200 धावांचे लक्ष्यही सामना जिंकण्यासाठी पुरेसे ठरेल असे दिसत आहे. न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात 200 धावा केल्या तरी भारतासमोर विजयासाठी किमान 303 धावांचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे इथून आता भारतीय संघ पुनरागमन कसे करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूझीलंडचा संघ 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. जर भारताने पुण्यातील दुसरा कसोटी सामना गमावला तर 2012 नंतर प्रथमच भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावेल. भारतीय भूमीवर 2012 मध्ये भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवला होता.

2012 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवले होते. त्या कसोटी मालिकेत बहुतेक वेळा तेंडुलकर आणि सेहवाग यांच्या फ्लॉप शोमुळे भारतीय संघाला नुकसान सहन करावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी
IND vs NZ; गावसकर-तेंडुलकरला जमलं नाही, ते ‘या’ स्टार खेळाडूने करून दाखवलं!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---