भारताचा महिला क्रिकेट संघ (indian women’s team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताला याठिकाणी न्यूझीलंडविरुद्ध एक टी२० सामना आणि पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. परंतु आता या आगामी मालिकेच्या नियोजनात बदल झाला आहे. मालिकेच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला आहे, पण याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाहीये. पुढच्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक स्पर्धा (ICC Women’s World Cup) खेळली जाणार आहे. त्याआधी न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील ही मालिका खेळली जाईल.
आधीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, उभय संघातील एकमात्र टी२० सामना ९ फेब्रुवारीला खेळला जाणार होता, तर एकदिवसीय मालिकेची सुरुवात ११ फेब्रुवारीपासून होणार होती. आता सुधारित वेळापत्रकानुसार टी२० सामन्याच्या तारखेत बदल केला गेला नाहीये. टी२० सामना ९ तारखेलाच खेळला जाईल. परंतु, एकदिवसीय मालिका एक दिवस उशीरा म्हणजेच १२ फेब्रुवारीपासून खेळली जाईल. एकदिवसीय मालिका उशीरा सुरू झाली, तरीही मालिकेतील शेवटचे दोन सामने आधी ठरलेल्या तारखेप्रमाणे खेळले जातील. ज्यामुळे मालिका वेळेत संपणार आहे.
भारतीय महिला संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना – ९ फेब्रुवारी (बुधवार)
पहिला एकदिवसीय सामना – १२ फेब्रुवारी (शनिवार)
दुसरा एकदिवसीय सामना – १५ फेब्रुवारी (मंगळवार)
तिसरा एकदिवसीय सामना – १८ फेब्रुवारी (शुक्रवार)
चौथा एकदिवसीय सामना – २२ फेब्रुवारी (मंगळवार)
पाचवा एकदिवसीय सामना – २४ फेब्रुवारी (गुरुवार)
ऑस्ट्रेलियामध्ये कडक विलगीकरणातून गेल्यानंतर न्यूझीलंडच्या एमआईक्यूमधील विलगीकरण भारतीय महिला संघाला सोपे वाटत असेल. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात १४ दिवसांच्या विलगीकरणात राहिला होता. परंतु, न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये एमआईक्यूमधील विलगीकरण तुलनेने खूप सोपे आहे. खेळाडूंच्या रूम मोठ्या आहेत, ज्यामध्ये त्यांना जीम करण्यासाठीही पुरेशी जागा आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बोलताना सांगितले की, “खेळाडूंना एमआईक्यूमध्ये खूप चांगले वाटत आहे. शनिवारी विलगीकरण पूर्ण झाल्यावर सराव सुरू होईल. रूमसोबत बाल्कनी असल्यामुळे खूप मदत मिळत आहे. जेवणही चांगले आहे. मात्र, खेळाडू एकमेकांशी भेटू शकत नाहीत.”
महत्वाच्या बातम्या –
कशी आहे रोहितच्या नेतृत्त्वाची शैली? भारताच्या ३१ वर्षीय गोलंदाजाने केला उलगडा
ईसीबीचा मोठा निर्णय! ऍशेस गमावल्याने ‘त्या’ व्यक्तीची केली हकालपट्टी
पाकिस्तानी खेळाडूंचा नादखुळा! झेल तर सोडलाच नंतर एकमेकांना दिली जबर धडक – व्हिडिओ