न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (New Zealand Cricket Board) याने सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही संघांना समान दर्जा मिळावा यासाठी बोर्डने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कसोटी चॅम्पियन ठरलेल्या न्यूझीलंडने स्थानिक आणि महिला खेळाडूंना लक्षात घेऊन प्रथमच एकच करार मंजूर केला आहे.
बोर्ड आता आंतरराष्ट्रीय आणि घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी पुरूष क्रिकेटपटूंएवढेच सामना शुल्क देणार आहेत. हा नियम येत्या १ ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. हा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड, प्रमुख असोसिएशनचे सहा सभासद आणि न्यूझीलंड क्रिकेट खेळाडूंंचे असोसिएशन यांनी मिळून घेतला आहे. नवीन करारानुसार हा नियम पुढील पाच वर्षासाठी लागू राहणार आहे.
न्यूझीलंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंना वनडे सामन्यासाठी २ लाख रूपये मिळणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी जवळपास एक लाख २५ हजार रूपये सामना शुल्क मिळणार आहे. त्याचबरोबर घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांसाठी ८६ हजार, ४० हजार आणि २८ हजार रूपये मिळणार आहेत.
या नव्या करारानुसार पुरूष क्रिकेटपटूंना एक कसोटी सामन्याचे ५ लाख सामना शुल्क मिळणार आहेत. नव्या करारानुसार प्रत्येक असोसिएशनच्या अव्वल क्रमांकाच्या महिला खेळाडूंना घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांमधून जास्तीत जास्त ९.५ लाख रूपये मिळणार आहे. करारप्राप्त महिला खेळाडूंची संख्या ५४ वरून ७२ करण्यात आली आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष डेविड व्हाइट म्हणाले, “हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल खेळाडू आणि असोसिएशनचे खूप धन्यवाद. महिला क्रिकेटच्या दृष्टीने आणि खेळासाठी घेतलेला हा आमचा आतापर्यंतचा महत्वपूर्ण निर्णय ठरला आहे.”
Standing together 🏏#CricketNation #Cricket pic.twitter.com/ENDmy81Qdi
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) July 5, 2022
या नव्या करारानंतर कर्णधार सोफी डिवाइन (Sophie Devine) हिने म्हटले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि पुरूष खेळाडूंना समान सामना शुल्क देण्याचा बोर्डाचा निर्णय उत्तम आहे. यामुळे युवा महिला आणि पुरूष खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.”
न्यूझीलंड पुरूष संघाचा कर्णधार केन विलियमसन (Kane Willamson) म्हणाला, “सध्याच्या खेळाडूंवरून पुढेे येणाऱ्या खेळाडूंसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. हा करार पुढे सुरू राहिला तर खूप काही चांगल्या बाबी घडतील.” नव्या करारानंतर पुरूष खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी २.५ कोटी रूपये मिळणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहलीनंतर आता अँडरसनबद्दल बोलताना सेहवागची घसरली जीभ, म्हणाला ‘आता तो म्हातारा झालाय’
कोहली भारी का बाबर? पत्रकाराच्या प्रश्नावर बाबरचे हास्यास्पद उत्तर, पाहा व्हिडिओ
कॅप्टन बुमराहने रचला इतिहास, पाकिस्तानच्या दिग्गजाचा विक्रम मोडत सेना देशांत केली ‘ही’ कामगिरी