वेलिंग्टन। यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्याची ऑफर देण्यात आलेली नाही आणि अशाप्रकारचे वृत्त केवळ अफवा आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने आयपीएलबद्दल बोलताना सांगितले आहे.
न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ता रिचर्ड बूक (Richard Boock) यांनी पुष्टी केली, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कधीच आयपीएलचे आयोजन करण्यात कोणताही रस दाखविलेला नव्हता. आयपीएलचे आयोजन मार्चमध्ये होणार होते. परंतू कोविड- १९ व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
“हे वृत्त पूर्णत: एक अफवा आहे. न्यूझीलंडकडून आयपीएलच्या आयोजनाबाबत म्हटले गेले, तर त्याच्यासाठी आम्ही तयार नाहीत. आम्ही आयपीएलचे आयोजन करण्याची ऑफर दिली नाही तसेच आमच्याकडे कोणीही असा प्रस्ताव ठेवलेला नाही. त्याच्या तारखा आणि न्यूझीलंडच्या भावी दौर्याच्या कार्यक्रमामुळे आम्ही वेळेमुळे असे करू शकत नाही,” असे बूक यांनी रेडिओ न्यूझीलंडशी बोलताना म्हटले.
भारतीय माध्यमांतील वृत्तांनुसार, जर कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन परदेशात केले गेले, तर यूएई आणि श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडदेखील आयोजनाच्या यादीत सामील झाला आहे. यानंतर बूक यांनी हे विधान केले. बीसीसीआय ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाऐवजी (T20 World Cup) सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनाची योजना करत आहे.
कोविड- १९ (Covid- 19) च्या वाढत्या प्रकरणांमुळे टी२० विश्वचषक स्थगित होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. जर आयपीएलचे आयोजन देशाबाहेर झाले, तर हे दुसऱ्यांदा असेल जिथे संपूर्ण आयपीएल (IPL) स्पर्धेचे आयोजन परदेशात केले जाईल. यापूर्वी भारतात निवडणूकीमुळे २००९ मध्ये आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये केले गेले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडे सामनाही कसोटीसारखा खेळणारे ५ भारतीय फलंदाज
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
-लाॅर्ड्सवर गांगुली त्या खेळाडूला म्हणाला, तू पण टी शर्ट काढ