---Advertisement---

या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड जोफ्रा आर्चरची मागणार माफी

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2019 7:57 PM
---Advertisement---

माउंट मोंगनूई। आज(25 नोव्हेंबर) न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 65 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

पण या सामन्यादरम्यान आज इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर(Jofra Archer) एका प्रेक्षकाने वांशिक टिप्पणी(racial abuse) केल्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेटने दिलगिरी(apology) व्यक्त केली आहे.

याबद्दल आर्चरने ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘जेव्हा मी माझ्या संघाला वाचवण्यासाठी फलंदाजी करीत होतो, तेव्हा वांशिक कारणावरून अपमानास्पद टिप्पणी ऐकून मला वाईट वाटले. त्या एका माणसाखेरीज या आठवड्यातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. बार्मी आर्मी नेहमीप्रमाणेच मस्त होती.’

https://twitter.com/JofraArcher/status/1198870354980040714

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याची पुष्टी केली की जेव्हा आर्चर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असताना ही घटना घडली.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही त्वरित आर्चरची माफी मागण्याची तयारी दाखवली. ‘न्यूझीलंड क्रिकेट आर्चरशी संपर्क साधेल आणि माफी मागेल. बे ओव्हल, माउंट मोंगनूई(Mount Maunganui) येथे पहिल्या कसोटीच्या दरम्यान पॅव्हेलियनमध्ये जात असताना प्रेक्षकांकडून त्याच्यावर वांशिक टिप्पणी केली गेली,’ असे न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने(New Zealand Cricket) आश्वासन दिले आहे की ते उद्या आर्चरशी संपर्क साधून त्याची माफी मागतील. तसेच हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या पुढील सामन्यादरम्यान याबद्दल दक्षता घेतली जाईल.

असे असले तरी मैदानावर उपस्थित सुरक्षा कर्मचारी आरोपी शोधण्यात अपयशी ठरले. पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषीला शोधण्यासाठी पुढील चौकशी करेल.

याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की ‘न्यूझीलंड क्रिकेट आपल्या कोणत्याही मैदानावर अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह भाषा सहन करत नाही आणि अशी प्रकरणे पोलिसांकडे पाठविली जातील.’

या प्रकरणाच्या चौकशीत इंग्लंड क्रिकेट बोर्डही भाग घेतील असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

आर्चरने या सामन्यात इंग्लंडकडून दुसऱ्या डावात 30 धावांची खेळी केली. तसेच सॅम करनबरोबर 9 व्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारीही रचली. मात्र त्यांना इंग्लंडसाठी सामना वाचवण्यात अपयश आले. त्यामुळे इंग्लंडला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला.

https://twitter.com/Maha_Sports/status/1198959388532174848

https://twitter.com/Maha_Sports/status/1198943956223946768

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---