भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पुढील महिन्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा महत्त्वपुर्ण सामना होणाप आबे. या सामन्यापुर्वी न्यूझीलंडचा खेळाडू हेनरी निकोलस हा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने स्वत सोशल मीडियाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे.
18 जून ते 22 जून या कालावधीत इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचा प्रमुख खेळाडू हेनरी याने या सामन्याच्या अगोदरच चाहत्यांना विवाहाची खुशखबर दिली आहे. हेनरीने रविवारी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्याने लिहिले ‘मिस्टर अँड मिसेस निकोल्स’ असे लिहिले आहे.
हेनरीच्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर, ती त्याची खूप चांगली मैत्रीण आणि प्रेयसी आहे. तिचे नाव लुसी असे आहे.
https://www.instagram.com/p/CPMP4SStm7p/?utm_source=ig_web_button_share_sheet
हेनरी हा 29 वर्षांचा असून त्याने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले पाऊल टाकले होते. त्यांनी 37 कसोटी, 52 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. 2152 कसोटी धावा, 1409 एकदिवसीय धावा आणि 19 टी20 धावांची त्याच्या खात्यात नोंद आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जुन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू झेलताना यष्टीरक्षकाचा घसरला पाय, कोलांटी उड्या मारत पडला मैदानावर; Video पाहून व्हाल लोटपोट
जमतंय की! ‘मिसेस बुमराह’च्या सुपरकूल डान्सने जिंकली चाहत्यांची मने, बघा भारी व्हिडिओ